Car Tips And Tricks: तुमच्या कार-बाईकला अचानक कोणी टक्कर दिली ? तर, 'या' ट्रिक वापरून मिळेल डॅमेजचा खर्च

काही वेळा तर पार्किंगमध्ये उभे असणाऱ्या गाड्यांना देखील टक्कर मारून जातात.
Car Accident Tips
Car Accident TipsSaam Tv

Get Cost of a Damaged Car: रस्त्यावरून गाड्या चालवताना बऱ्याचदा दुर्घटना होत असतात. काही वेळा तर पार्किंगमध्ये उभे असणाऱ्या गाड्यांना देखील टक्कर मारून जातात. अशावेळी कार इन्शुरन्स असून सुद्धा तुम्हाला तुमची गाडी रिपेअर करण्यासाठी भरपूर धावपळ करावी लागते.

जर तुमच्या गाडीला अचानक कोणी टक्कर मारली आणि नुकसान पोहोचवले तर, काय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. समोरच्या व्यक्तीबरोबर डील केली पाहिजे आणि त्याच्याकडून नुकसान भरपाई मागितले पाहिजे.

Car Accident Tips
World Fastest Electric Car : महिंद्राची इलेक्ट्रीक सुपरकार लॉन्च, 0-100 किमी ताशी फक्त 1.86 सेकंदात वेग पकडणार !

1. सर्वात पहिला नियम (Rules) :

आपल्या गाडीचे नुकसान झालेले पाहून राग येणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. गाडीचे कितीही नुकसान झालेले असू द्या, तुम्हाला तुमच्या राग आला कंट्रोल मध्ये ठेवायचे आहे आणि अजिबातच भांडण करायचे नाही आहे.

2. या गोष्टी पडताळा :

सर्वात आधी तुम्हाला हे चेक करायचं आहे की, समोरच्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीशी निगडित काही कागदपत्र आहेत की, नाही. असं पण होऊ शकते की कार दुर्घटना करणारा व्यक्ती नाबालिक असू शकतो. असे असेल तर तुम्ही लवकरच योग्य ती कारवाई करून पोलिसांना सांगितले पाहिजे. जर तुम्हाला योग्य ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखवलं गेलं तर, तुम्हाला त्यांच्या गाडीची (Car) इन्शुरन्स माहिती मागितली पाहिजे. सर्व कार इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स सर्वात आधी जोडलेले असते. अशातच समोरच्या व्यक्तीच्या इच्छेनुसार तो आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमार्फत तुमची गाडी रिपेअर करू शकतो.

Car Accident Tips
Car Charging Station : भारतात 20 हजार इलेक्ट्रीक वाहनांसाठी 'ही' कंपनी उभारतेय चार्जिंग पॉइंट, जाणून घ्या प्लान

3. जर डील पैशांमध्ये (Money) झाले तर :

जर समोरच्या व्यक्तीकडे इन्शुरन्स नसेल किंवा त्याच्या इन्शुरन्स मार्फत तुमची गाडी रिपेअर होऊ शकत नसेल तर, तुम्हाला नुकसान भरपाई पैशांमार्फत मिळाली पाहिजे. अशामध्ये प्रश्न येतो की तुम्हाला किती हजार रुपये वसूल केले पाहिजे? यासाठी तुम्ही एखाद्या कार मेकॅनिकल किंवा कार अधिकृत वर्कशॉपला संपर्क करू शकता आणि डायमेज झालेल्या पार्ट्सची किंमत जाणून घेऊ शकता.

4. किती पैसे घेतले पाहिजे :

जर तुम्ही तुमच्या कारला स्वतःच्या इन्शुरन्स मार्फत ठीक करणार आहात, तरी त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही ना काही खर्च येईल. पहिले नुकसान, जर तुमचे इन्शुरन्स झिरो डीप नाही आहे, तर तुम्हाला डॅमेज झालेल्या पार्ट्सची काही टक्के रक्कम द्यावी लागेल.

Car Accident Tips
Bajaj Bikes in India : केवळ 75 हजारात मिळतेय बजाजची स्टायलिश बाईक, मायलेजही देतेय दमदार !

दुसरे नुकसान फाईल चार्जच्या रूपात असेल, जे 1000 एवढे असते. त्याचबरोबर तिसरी नुकसान असेल तर ते नो क्लेम बोनसचे असेल. अशावेळी लवकरात लवकर आपल्या इन्शुरन्स पॉलिसीला चेक करा आणि पहा की, किती टक्क्यांचे नो क्लेम बोनस मिळणार आहे. ही रक्कम ती असते जी तुम्ही कार एनशोरेन्स रिन्यू करताना त्याच स्थितीमध्ये असता जर तुम्ही कोणतेही क्लेम घेतले नसेल.

अशा कंडिशनला पाहिल्यावर एस्टिमेट लावा की, तुमचे किती रुपयापर्यंत खर्च होऊ शकते आणि ती रक्कम तुम्ही समोरच्या पार्टीकडून घेऊ शकता. असाच तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचा भांडणे करणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com