Hormonal Health freepik
लाईफस्टाईल

Hormonal Health: PCOS आणि PCOD एकसारखेच वाटते का? जाणून घ्या यामधील महत्त्वाचा फरक

PCOS vs PCOD: चुकीचा आहार आणि असंतुलित जीवनशैलीमुळे तरुण महिलांमध्ये लवकरच अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत, ज्यात पीसीओएस आणि पीसीओडी हे हार्मोनल विकार प्रमुख ठरतात.

Dhanshri Shintre

अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे महिलांमध्ये लहान वयातच विविध आजारांचा धोका वाढतो आहे. विशेषतः पीसीओएस आणि पीसीओडी हे दोन हार्मोनल विकार अधिक प्रमाणात आढळतात. या विकारांमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. दोन्ही विकार सारखेच वाटले तरी त्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. चला, त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीसीओडी आणि पीसीओएस हे दोन्ही विकार महिलांच्या अंडाशयांवर परिणाम करणारे आहेत. अंडाशय हे फक्त अंडी निर्माण करत नाहीत, तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे महत्त्वाचे संप्रेरकही स्रवित करतात. त्यामुळे अंडाशय कामकाजमध्ये बिघाड झाल्यास मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि संपूर्ण स्त्री आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात.

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) हा महिलांच्या प्रजनन वयात होणारा एक सामान्य हार्मोनल विकार आहे. यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि अंडाशयात द्रवाने भरलेल्या छोट्या गाठी निर्माण होतात, ज्यामुळे अंडोत्सर्जन व्यवस्थित होत नाही. काही महिलांमध्ये चेहऱ्यावर जास्त केस येणे, त्वचेवर पुरळ उठणे किंवा वजन वाढणे यासारखी लक्षणे दिसून येतात. योग्य उपचार न घेतल्यास पीसीओएसमुळे वंध्यत्वाचाही धोका निर्माण होतो, त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार आवश्यक ठरतात.

PCOS ची लक्षणे काय आहेत?

- पीसीओएसचं एक प्रमुख लक्षण म्हणजे मासिक पाळी अनियमित होणे किंवा काही वेळा पाळी पूर्णपणे थांबण्याची समस्या निर्माण होणे.

- मासिक पाळी नेहमीपेक्षा अधिक दिवस चालणे किंवा दीर्घकाळ सुरू राहणे हेही पीसीओएसशी संबंधित एक सामान्य आणि लक्षात घेण्यासारखं लक्षण आहे.

- अँड्रोजन हार्मोन्सची पातळी वाढल्यास, महिलांच्या चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागांवर अनावश्यक केस वाढण्याची समस्या उद्भवू शकते.

- चेहऱ्यावर तीव्र मुरुमे येणे किंवा लवकर केस गळण्याची समस्या दिसून आल्यास, ती पीसीओएसची संभाव्य लक्षणं असू शकतात.

PCOD म्हणजे काय ते जाणून घ्या?

पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा पीसीओएसप्रमाणेच एक हार्मोनल विकार आहे, जो अंडाशयांवर परिणाम करतो. यामुळे मासिक पाळी अनियमित होते, वजन वाढते, त्वचेवर पुरळ येतात आणि काही वेळा वंध्यत्वही होऊ शकते. अंडाशय सूजलेले व मोठे होऊ शकतात. पीसीओडीचा कायमस्वरुपी इलाज नसला तरी, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैली बदल करुन याची लक्षणे नियंत्रित करता येतात.

त्यांच्यात काही फरक आहे का?

पीसीओडी(PCOD) आणि पीसीओएस(PCOS) यांची लक्षणं एकसारखी वाटली तरी ते वेगवेगळे विकार आहेत. पीसीओडी हा तुलनेने सौम्य असून अंडाशयातील सिस्ट व ओव्हुलेशनमध्ये अडथळा यामध्ये दिसतो. तर पीसीओएस अधिक गंभीर असून त्यात हार्मोनल असंतुलन, इन्सुलिन प्रतिकार व चयापचयाशी संबंधित अडचणी निर्माण होतात. त्यामुळे दोन्ही विकारांवर वेगळ्या प्रकारे लक्ष देणे आवश्यक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT