Summer Skin Care: गर्मीमध्येही ओठ फाटतात? 'हे' घरगुती उपाय आहेत एकदम परफेक्ट

Chapped Lips: उन्हाळ्यातही ओठ सतत फुटत असतील, तर काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही नैसर्गिकरित्या या त्रासातून आराम मिळवू शकता आणि ओठ मऊ ठेवू शकता.
Summer Skin Care: गर्मीमध्येही ओठ फाटतात? 'हे' घरगुती उपाय आहेत एकदम परफेक्ट
Published On

उन्हाळ्यात ओठ फाटणे ही सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. प्रखर उन्हामुळे, वाढते प्रदूषण आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेकांना ही समस्या जाणवते. ओठ सतत कोरडे राहणे, ताण येणे हे याचे लक्षण असते. मात्र, काही घरगुती उपाय आणि योग्य देखभाल केल्यास या त्रासावर सहज मात करता येते. या लेखात आपण अशाच काही प्रभावी आणि सोप्या उपायांची माहिती घेणार आहोत.

Coconut Oil
Coconut OilFreepik

नारळ तेल लावा

जर ओठ सतत फाटत असतील, तर खोबरेल तेल एक उत्तम घरगुती उपाय ठरतो. त्यातील नैसर्गिक घटक ओठांना आर्द्रता देतात. झोपण्यापूर्वी ओठांवर हलक्या हाताने तेल लावावे आणि सकाळपर्यंत तसेच ठेवावे.

Honey
HoneyFreepik

मध लावा

मध हा ओठ फाटण्यावर प्रभावी घरगुती उपाय आहे. ओठांवर मधाचा थर लावा, १०-१५ मिनिटे ठेवा. नंतर हलक्या हाताने पुसून टाका. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा आणि रात्रभर तसेच ठेवावे.

Aloe Vera
Aloe VeraFreepik

कोरफडीचा वापर करा

अनेक घरांमध्ये आढळणारी कोरफड वनस्पती ओठ फाटण्यावर उपयुक्त ठरते. कोरफडीचे ताजे जेल रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. काही दिवस नियमित वापर केल्याने ओठ मऊ व निरोगी होतात.

Rose Water
Rose WaterFreepik

गुलाबपाणी

उन्हाळ्यात घराघरात आढळणारे गुलाबपाणी फाटलेल्या ओठांवर प्रभावी ठरते. कापसाच्या बोळ्याने गुलाबपाणी ओठांवर हलक्याने लावा. हा उपाय ओठांना नमी देऊन त्यांना हायड्रेट आणि मऊ ठेवण्यास मदत करतो.

Ghee
GheeFreepik

तूप

उन्हाळ्यात तूप एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. याच्या वापरामुळे ओठ मऊ, कोमल आणि हायड्रेट राहतात. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे तूप लावल्यास सकाळपर्यंत त्यांचा कोरडेपणा कमी होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com