New Year Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

New Year Vastu Tips: नव्या वर्षात घरातील 'या' गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेऊ नका; आयुष्यभर भासेल पैशांची कमतरता

New Year 2025 Vastu Tips for Home: देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 5 गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. नवं वर्ष प्रत्येकाला सुखाचं तसंच समृद्धीचं जावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र यासाठी वास्तू शास्त्राचाही मोठा वाटा असतो. नवीन वर्षाची सुरुवात शुभ होण्यासाठी तुमच्यासाठी वास्तुशास्त्राविषयी काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, नवीन वर्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी व्हावं. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 5 गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. लक्ष्मीच्या उपस्थितीमुळे तुमच्या घरात आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आर्थिक संकट आणि अनेक समस्या येणार नाहीत.

तिजोरी रिकामी ठेऊ नका

घराची तिजोरी म्हणजेच पैसे ठेवण्याची जागा कधीही रिकामी ठेवू नये. वास्तू शास्त्रानुसार, गरजेच्या वेळीही त्यात काही पैसे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तिजोरीत शंख, गाय किंवा गोमती चक्र देखील ठेवू शकता.

देव्हाऱ्यातील जलपात्र रिकामी ठेऊ नये

वास्तुशास्त्र सांगतं की, व्यक्तीने आपल्या घरातील मंदिरात ठेवलेलं पाण्याचं भांडं कधीही रिकामं ठेवू नये. माणसांप्रमाणेच देवालाही तहान लागते, असा तर्क यामागे आहे. त्यामुळे रोज पाण्याच्या पात्रात गंगाजल आणि तुळशीची पाने ठेवली पाहिजे.

अन्नाचं भंडार रिकामं होऊ देऊ नका

घरातील धान्याची भांडी रिकामी ठेवणं देखील वास्तुशास्त्रानुसार चुकीचं मानण्यात येतं. तुम्हाला असं वाटतं की, तुमचे अन्न संपत आलंय तर ते लगेच भरा. धान्याचं भांडार रिकामं ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा पसरू लागते.

पैशांचं पाकिट रिकामी ठेऊ नये

आजकालच्या जगात प्रत्येकाकडे पैसे असतात. वास्तु शास्त्रानुसार, व्यक्तीने कधीही रिकामी पर्स ठेवू नये. असं केल्यास गरिबी तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी काही पैसे पर्समध्ये ठेवण्याची सवय ठेवा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT