Stage 0 cancer saam tv
लाईफस्टाईल

Stage 0 cancer: शरीरात दिसणारे हे छोटे बदल अजिबात दुर्लक्षित करू नका, कॅन्सरच्या स्टेज 0 मध्ये दिसतात ही 4 लक्षणं

Early cancer symptoms: स्टेज 0 कॅन्सर म्हणजे काय, त्याची सुरुवातीची लक्षणं, कार्सिनोमा इन सिटूचे प्रकार, ब्रेस्ट, त्वचा आणि सर्व्हिक्समधील बदल, वेळेत निदानाचं महत्त्व आणि उपचारांमुळे कॅन्सरचा धोका कसा कमी करता येतो हे जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरचं नाव ऐकलं की आपल्या मनात भीती निर्माण होते. पण प्रत्येक कॅन्सर सुरुवातीपासूनच गंभीर अवस्थेत असतो असं नाही. स्टेज 0 कॅन्सर, ज्याला वैद्यकीय भाषेत कार्सिनोमा इन सिटू (Carcinoma in Situ - CIS) म्हटलं जातं. हा कॅन्सरचा अगदी सुरुवातीचा टप्पा आहे. या अवस्थेत शरीरात काही पेशींमध्ये असामान्य बदल झालेले असतात. मात्र या पेशी ज्या ठिकाणी तयार झाल्या आहेत त्याच ठिकाणी मर्यादित असतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही अवस्था पूर्णपणे घातक कॅन्सर मानली जात नसली तरी ती कॅन्सरची सुरुवात किंवा कॅन्सरपूर्व अवस्था असते. कारण वेळेत उपचार न केल्यास या असामान्य पेशी पुढे जाऊन कॅन्सरमध्ये बदलू शकतात. त्यामुळे ही अवस्था लवकर ओळखून योग्य उपचार करण अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

स्टेज 0 कॅन्सर म्हणजे काय?

स्टेज 0 कॅन्सरमध्ये मायक्रोस्कोपखाली पाहिल्यास पेशी कॅन्सरसारख्या दिसतात. मात्र त्या फक्त ज्या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत तिथेच मर्यादित राहतात. त्यांनी आजूबाजूच्या ऊतींमध्ये प्रवेश केलेला नसतो. ही अवस्था शरीराच्या कोणत्या भागात आहे त्यानुसार तिचे वेगवेगळे प्रकार असतात. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, यामध्ये खालील प्रकारांचा समावेश होतो.

  • अॅडेनोकार्सिनोमा इन सिटू (Adenocarcinoma in situ)- गर्भाशयाच्या मुखात (सर्व्हिक्स), फुफ्फुसांमध्ये किंवा पचनसंस्थेत आढळू शकतो.

  • डक्टल कार्सिनोमा इन सिटू (DCIS)- ब्रेस्टमधल दुधाच्या नलिकांमध्ये आढळतो.

  • स्क्वॅमस सेल कार्सिनोमा इन सिटू- त्वचा, तोंड किंवा स्वरयंत्रात (लॅरिंक्स) होऊ शकतो.

स्टेज 0 कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती?

अनेक वेळा स्टेज 0 कॅन्सरची कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. विशेषतः शरीराच्या आतल्या अवयवांमध्ये हा बदल झाला असेल तर त्याची जाणीव होत नाही. मात्र त्वचा, तोंड किंवा सहज दिसणाऱ्या भागांमध्ये काही संकेत दिसू शकतात.

त्वचेमध्ये दिसणारे बदल

त्वचेवर दीर्घकाळ टिकून राहणारे लालसर डाग दिसू शकतात. काही ठिकाणी त्वचा गुळगुळीत, चमकदार किंवा मोत्यासारखी दिसणारी गाठ तयार होऊ शकते. जखम भरून न येणं, वारंवार खरूज येणं किंवा त्वचा सतत सोलली जाणं हीदेखील सुरुवातीची लक्षणं असू शकतात. विशेषतः चेहरा, मान आणि हातांसारख्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात जास्त येणाऱ्या भागांमध्ये हे बदल दिसू शकतात.

तोंडातील बदल

तोंडाच्या आतील बाजूस पांढरे किंवा लाल चट्टे दिसणं जे सहज घासूनही निघत नाहीत. हे दुर्लक्षित करू नये. ओठ, हिरड्या किंवा जिभेवर जाडसर किंवा खडबडीत भाग तयार होणं तसंच तोंडात सतत वेदना किंवा जळजळ जाणवत राहणं हीदेखील सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

स्तनांमध्ये होणारे बदल

डक्टल कार्सिनोमा इन सिटू (DCIS) किंवा लोब्युलर कार्सिनोमा इन सिटू (LCIS) हे बहुतेक वेळा नियमित मॅमोग्राफी तपासणीत आढळून येतात. सुरुवातीला कोणतीही लक्षणं नसतात. मात्र काही महिलांना स्तनामध्ये गाठ जाणवू शकते किंवा स्तनाग्रातून स्त्राव येऊ शकतो.

गर्भाशयाच्या मुखातील बदल

सर्व्हिक्समधील असामान्य बदल बहुतांश वेळा पॅप स्मिअर किंवा एचपीव्ही (HPV) चाचणी दरम्यान लक्षात येतात. सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही ठळक लक्षणं नसतात. या अवस्थेला सर्व्हायकल कार्सिनोमा इन सिटू (CIN) असं म्हणतात. यात गर्भाशयाच्या मुखावरील पेशींमध्ये बदल होतात, पण त्या आसपासच्या ऊतींमध्ये पसरलेल्या नसतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूरमध्ये रक्तरंजित थरार! तरुणावर तलवार अन् चाकून सपासप वार, वाचवायला गेलेल्या २ मित्रांनाही सोडलं नाही

Cham Cham Recipe: घरीच बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट चमचम, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: धुळ्यात भरधाव ट्रॉलाची तीन वाहनांना धडक; अपघातात एकाचा मृत्यू

६ बंडखोर खासदार,५० टक्क्यांहून अधिक आमदार NDAची साथ सोडणार; मोठा राजकीय भूकंप होणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Dharashiv Politics: धाराशिवमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने, १० ते १२ वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

SCROLL FOR NEXT