Hypertension Management Routine: सकाळच्या या 5 सवयी तुमचा बीपी ठेवतील नियंत्रणात, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा

Blood Pressure Control: उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकन हार्ट असोसिएशनने सुचवलेल्या महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या. DASH डाएट, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव नियंत्रण आणि औषधांचे योग्य पालन यामुळे हृदय निरोगी ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
Hypertension Management Routine
Hypertension Management Routinesaam tv
Published On

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. त्यापैकी एक आजार म्हणजे हायपरटेन्शन. जगभरात जवळपास लाखो लोकांना याचा त्रास आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही जीवशैलीमध्ये योग्य ते बदल केले तर आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) ने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी सुचवल्या आहेत. ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्या ४ पैकी एका व्यक्तीचा रक्तदाब नियंत्रणात असतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या सवयी जोपासल्या पाहिजेत ते पाहूयात.

झोपेची आणि उठण्याची एकच वेळ ठरवा

दररोज एकाच वेळी झोपणं आणि सकाळी एकाच वेळी उठणं ही सवय शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. यामध्ये शनिवार-रविवारचाही अपवाद करू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात. काही संशोधनातून असं दिसून आलंय की, ज्यांची झोपेची वेळ ठरलेली नसते त्यांच्यात उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो. प्रौढ व्यक्तींनी दररोज किमान 7 ते 9 तास झोप घेणं गरजेचं आहे. चांगली झोप यावी यासाठी झोपण्यापूर्वी खोलीतील वातावरण शांत आणि थंड ठेवा, लाईट्सचा प्रकाश कमी करा आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करा.

DASH डाएटचा अवलंब करा

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहाराचीही तितकीच गरज असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने DASH (Dietary Approaches to Stop Hypertension) या आहार पद्धतीची शिफारस केली आहे. या आहारात मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी ठेवण्यावर भर दिला जातो. त्याचप्रमाणे जास्त चरबीयुक्त पदार्थ, फुल-फॅट दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसंच तेलकट आणि तुपकट पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. याऐवजी रोजच्या आहारात ताजी फळं, भाज्या, मासे, कमी चरबीयुक्त किंवा फॅट-फ्री दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये यांचा समावेश करावा.

Hypertension Management Routine
Kidney Tumor: पाठदुखीकडे दुर्लक्ष करत वारंवार पेनकिलर घेताय? किडनी ट्युमरचा धोका असू शकतो, तज्ज्ञांचा इशारा

रोज शरीराची हालचाल ठेवा

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवसभर शक्य तितकं एक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, आठवड्यात किमान 150 मिनिटं मध्यम ते जास्त तीव्रतेचा व्यायाम करणं आवश्यक आहे. हे एका दिवसात करण्याची गरज नाही. दररोज सुमारे 30 मिनिटे चालणं, वेगाने चालणं किंवा धावणं यामुळेही हे उद्दिष्ट सहज पूर्ण होऊ शकते.

तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा

सततचा ताण किंवा मानसिक तणावही रक्तदाब वाढवू शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक अभ्यासांमध्ये तणाव नियंत्रणात ठेवल्यास उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होत असल्याचं आढळलं आहे. शरीरातील तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा.

Hypertension Management Routine
Kidney Cancer: किडनी कॅन्सरची सुरुवात अनेकदा या 1 लक्षणाने होते; 99% लोकं करतात दुर्लक्ष

औषधं वेळेवर घेणं विसरू नका

जीवनशैलीत बदल करणं महत्त्वाचं असलं तरी त्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं बंद करणं किंवा टाळणे योग्य नाही. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे वेळेवर घ्या. त्याचबरोबर नियमितपणे रक्तदाब तपासून त्याची नोंद ठेवणंही तितकंच गरजेचं आहे.

Hypertension Management Routine
Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com