Vastu Tips pitru Paksh saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: पितृपक्षामध्ये वास्तू शास्त्राच्या 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; पितर नाराज होण्याची शक्यता

Vastu Tips: आपण ज्योतिष्य शास्त्राची मदत घेतो, त्याचप्रमाणे वास्तू शास्त्र देखील महत्त्वाचं आहे. पितृ पक्षात वास्तू शास्त्रांच्या काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

Surabhi Jagdish

पितृ पक्षाला सुरुवात झाली असून पितरांना तृप्त करण्यासाठी तसंच त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, पूजा आणि पिंडदान केलं जातं. ज्याप्रमाणे आपण ज्योतिष्य शास्त्राची मदत घेतो, त्याचप्रमाणे वास्तू शास्त्र देखील महत्त्वाचं आहे. पितृ पक्षात वास्तू शास्त्रांच्या काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर यामध्ये कोणतीही चूक झाली तर त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होत असतो.

पितृ पक्षामध्ये या चुका करू नये

पितृ पक्षामध्ये सामन्यापणे आपण पितरांचा फोटो लावतो. मात्र वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरातील ड्रॉईंग रूम किंवा बेडरूममध्ये यांचे फोटो लावू नयेत. असं केल्याने घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. याशिवाय तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते.

घरामध्ये कोणत्या दिशेला लावावा फोटो

जर तुम्हाला तुमच्या घरात पितरांचा फोटो लावायचा असेल तर तो दक्षिण दिशेला लावावा. ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो, असं मानलं जातं. त्यामुळे जर तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी फोटो लावला असेल तर वेळीच लक्ष द्या.

मांस सेवन करणं शक्यतो टाळावं

पितृ पक्षामध्ये मांसाहारी पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. शास्त्रानुसार याचं कारण म्हणजे, कारण पितृ पक्षाच्या दिवसांत तुमचे पूर्वज पृथ्वीवर येतात. यावेळी आपण त्यांची पूजा करून पिंड दान करतो. अशा स्थितीत तुम्ही मांसाहारी सेवन केल्याने ते अपवित्र होण्याचा धोका असतो. त्यामुळे पितृ पक्षामध्ये नेहमी शाकाहारी अन्न खाऊन पितरांची पूजा करावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT