Dry kids clothes outside at night saam tv
लाईफस्टाईल

Kids Clothes: लहान मुलांचे कपडे रात्रीच्या वेळेस बाहेर सुकवू नका, धार्मिक नाही तर यामागे आहे वैज्ञानिक कारण!

Dry kids clothes outside at night: तुम्हीही तुमच्या लहान मुलांचे कपडे रात्रीच्या वेळी घराबाहेर सुकत घालत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मात्र तुम्हाला माहितीये का यामागे विज्ञान देखील आहे.

Surabhi Jayashree Jagdish

थंडीच्या दिवसातील एक सर्वात मोठी समस्या म्हणजे ओले कपडे सुकणं. ऐरवी देखील कपडे सुकावे यासाठी आपण घराबाहेरच्या दोरीवर किंवा खिडकीबाहेर वाळत घालतो. यामध्ये लहान मुलांचे कपड्यांचा देखील समावेश असतो. तुम्हीही तुमच्या लहान मुलांचे कपडे रात्रीच्या वेळी घराबाहेर सुकत घालत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

अनेकदा कुटुंबातील वडीलधारी मंडळी लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर सुकण्यास मनाई करतात. धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा असते. ही उर्जा जी लहान मुलांच्या बाहेर कोरडे पडलेल्या कपड्यांमध्ये जाऊन व्यक्तीच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. मात्र तुम्हाला माहितीये का यामागे विज्ञान देखील आहे.

जर आपण विज्ञानाबद्दल बोललो तर विज्ञान देखील रात्रीच्या वेळी लहान मुलांचे कपडे बाहेर कोरडे करण्याचा सल्ला देत नाही. चला जाणून घेऊया लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर का सुकवू नयेत, यामागे विज्ञान काय सांगतं.

विज्ञान काय म्हणतं?

रात्रीच्या वेळी दव पडल्याने कपडे सुकण्याऐवजी ओले होतात. कपड्यांमध्ये असलेल्या या आर्द्रतेमुळे, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि बुरशी वाढू शकतात. असे कपडे लहान मुलाला घातल्यानंतर त्यांना इन्फेक्शनचा धोका असतो. ज्यामुळे लहान मुलांचे नुकसान होऊ शकतं.

त्वचेची एलर्जी

कपड्यांवर असलेल्या ओलाव्यामुळे अनेक प्रकारचे कीटक, डास रात्री कपड्यांवर बसतात. यावेळी हे कीटक त्यांची अंडी आणि घाण कपड्यांवर सोडू शकतात. यामुळे मुलाला त्वचेची ऍलर्जी किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असू शकते.

योग्य पद्धतीने सुकत नाही कपडे

कपडे प्रभावीपणे सुकण्यासाठी सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान आवश्यक आहे. दुपारी कपडे सुकवण्यासाठी या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होतात. तर रात्री ओलाव्यामुळे कपडे उशिरा सुकतात किंवा काही प्रमाणात ओले देखील राहतात. त्याचप्रमाणे अनेक वेळा रात्री अचानक खराब हवामानामुळे धुतलेले कपडे धूळ, चिखल किंवा पावसामुळे घाण होतात आणि खराब होण्याची शक्यताही अधिक असते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT