Temple Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Temple Vastu Tips: घरातील देव्हाऱ्यात चुकूनही ठेऊ नका 'या' मूर्ती; घरावर येईल मोठं संकट

Temple Vastu Tips: ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील खूप महत्त्वाचं असून त्याचे काही नियम आहेत. या नियमांचं योग्य पद्धतीने पालन केल्यास घरातील दोष दूर होण्यास मदत होते.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या प्रत्येकाच्या घरी हा देव्हारा असतोच. हिंदू धार्मिक लोकांच्या घरी देव्हारा पहायला मिळतो. यामध्ये देवाच्या मूर्ती असून त्यांची पुजा केली जाते. वास्तू शास्त्रानुसार, घरात प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट अशी जागा असते. या जागेनुसारच त्या गोष्टी ठेवल्याने परिणाम चांगले मिळतात.

वास्तू शास्त्रांच्या नियमांचं पालन केल्याने तुमच्या घरात-सुख समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा घरी येत नाही. अशानुसार, वास्तू शास्त्राप्रमाणे घरातील देव्हारा आणि देव्हाऱ्यातील मूर्तींबाबत देखील नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनुसार, घरातील देव्हाऱ्यामध्ये काही मूर्ती ठेऊ नयेत.

वास्तू शास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्यात या मूर्ती असतील तर ते अशुभ मानलं जातं. या मूर्तीमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येण्याचा धोका असतो. त्यामुळे तुमच्या घरातील देव्हाऱ्यात या मूर्ती असतील तर त्या आजच काढून टाका. पाहूयात घरातील देव्हाऱ्यात कोणच्या मूर्ती नसाव्यात.

शनिदेवाची मूर्ती

हिंदू धर्मामध्ये शनी देवाला विशेष महत्त्व देण्यात आलं असून त्यांना न्याय देवता मानलं जातं. शनी देवाची पूजा केली जाते मात्र त्यांची मूर्ती किंवा फोटो देव्हाऱ्यात ठेवला जात नाही. शनीदेव फार उग्र असून त्यांची मूर्ती देव्हाऱ्यात ठेऊ नये.

काली मातेची मूर्ती

शनीदेवाप्रमाणेच काली मातेची मूर्तीही तुमच्या घरातील देव्हाऱ्यामध्ये ठेऊ नये. असं मानलं जातं की, काली मातेच्या पूजेचे नियम खूप कठीण असतात आणि अशा पद्धतीच्या पूजा घरी करू नयेत.

नटराजाची मूर्ती

आपण पाहिलं असेल अनेकांच्या घरी नटराजाची मूर्ती असते. नटराज हे भगवान शिव यांचं रौद्र रूप आहे. त्यामुळे त्यांची मूर्ती घराच्या देव्हाऱ्यात ठेऊ नये. असं केल्याने घरात भांडणं होण्याचा धोका अधिक असतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

SCROLL FOR NEXT