हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व दिलं जातं. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि देवगुरु गुरू यांना समर्पित केलेला असतो. या दिवशी श्रद्धेने यांची पूजा केली आणि काही विशेष उपाय केले तर जीवनात सकारात्मक बदल येऊ लागतात. यापैकी एक उपाय म्हणजे गुरुवारी हळद घराच्या दारात ठेवणं. हे केवळ धार्मिक दृष्टीकोनातून फायदेशीर नाही तर घरात सुख, शांती आणि संपत्ती देतं अशी मान्यता आहे.
गुरुवारी लक्ष्मीपती विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुरू असलेल्या आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात. ज्या व्यक्तींवर दीर्घकाळ आर्थिक संकट आहे त्यांनी आजच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. याशिवाय या दिवशी उपवास करून पिवळी फुलं, पिवळी मिठाई या गोष्टी अर्पण कराव्यात.
हळद हे केवळ भारतीय स्वयंपाकात वापरलं जात नाही. तर वास्तू शास्त्रानुसार, ही एक पवित्र गोष्ट मानली जाते. आयुर्वेदातही हळद आपल्या शुद्धता आणि रोगांवरील उपयुक्त गुणधर्मांसाठी ओळखली जातं. त्याचबरोबर धार्मिक दृष्टीकोनातून हळद हे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं.
गुरुवारी ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजेत. यानंतर चिमूटभर हळद घराच्या मुख्य ठिकाणी ठेवा किंवा हळदीचे पाणी बनवून शिंपडा. या उपायाने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. यामुळे घरात शांतता राखण्यास मदत होते.
हळद ही देवी लक्ष्मीला देखील प्रिय असते. जर एखादी व्यक्ती सतत आर्थिक अडचणी, कर्ज किंवा खर्चाने त्रस्त असेल तर त्याने दर गुरुवारी हा छोटासा उपाय अवश्य केला पाहिजे. दारात हळद ठेवल्याने घरात आशीर्वाद तर मिळतोच. शिवाय कुटुंबात प्रेम आणि सलोखा ही टिकून राहण्यास मदत होते.
जर घरात असा कोपरा किंवा दरवाजा असेल जिथून वारंवार नकारात्मकता जाणवत असेल किंवा वारंवार भांडणं होतं असतील तर त्या ठिकाणी हळदीची लेप किंवा पाणी शिंपडण अतिशय परिणामकारक ठरतं. या उपायामुळे वातावरण हळूहळू बदलण्यास मदत होते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.