Blue bruises on skin saam tv
लाईफस्टाईल

Blue bruises on skin: कोणतीही दुखापत नसतानाही शरीरावर पडतात निळे डाग? यामागे असू शकतात हे आजार

Causes Of Random Bruises On The Body: जखम न होता शरीरावर वारंवार निळे किंवा जांभळे डाग दिसत असतील तर ते व्हिटॅमिन कमतरता, प्लेटलेट्सची समस्या किंवा रक्ताशी संबंधित गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Surabhi Jayashree Jagdish

तुमच्या शरीरावर कधी कोणत्याही कारणाशिवाय निळे किंवा जांभळे डाग दिसलेत का? अनेकदा असं होतं की, कोणत्याही जखमेशिवाय निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे डाग अचानक दिसू लागतात . लोक अनेकदा हे सामान्य आहे असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात परंतु काही प्रकरणांमध्ये, हे एखाद्या अंतर्गत समस्येचं लक्षण असू शकतं. वारंवार येणाऱ्या आणि कारण नसलेल्या जखमांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.

शरीरावर असे डाग का दिसतात?

हेल्थलाइन वेबसाइटच्या एका अहवालानुसार, कधीकधी शारीरिक श्रम किंवा हेवी जीम केल्यामुळे त्वचेखालील लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो. स्नायूंवरील अतिरिक्त दाबामुळे या रक्तवाहिन्या फुटू शकतात आणि त्वचेखाली रक्त साचू शकतं. यामुळे अशा प्रकारचे निळसर डाग तुमच्या शरीरावर दिसू शकतात.

काही प्रकारच्या औषधांमुळे देखील असं होण्याची शक्यता असते. रक्त पातळ करणारी औषधं, विशेषतः ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन आणि नॅप्रोक्सेन यांसारखी औषधं, रक्त लवकर गोठण्यास कारणीभूत ठरू शकतात. ज्यावेळी रक्त सामान्य गतीने गोठत नाही तेव्हा ते त्वचेखाली पसरतं अशा प्रकारचे डाग दिसू शकतात. जर तुम्ही कोणती वेगळी किंवा नवीन औषधं घेतली आणि हा त्रास सुरु झाला तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

काही आवश्यक पोषक तत्वांची कमतरता देखील ही समस्या वाढवू शकणार आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचा आणि रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे थोड्याशा दाबानेही डाग पडू शकतात. आयर्नच्या कमतरतेचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावू शकते. त्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय वारंवार दिसणारे निळे डाग हे पोषक तत्वांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतात.

या आजारामध्ये शरीरावर डाग दिसण्याची शक्यता

इम्युन थ्रोम्बोसायटोपेनियासारख्या दुर्मिळ आजारांमुळे प्लेटलेटची संख्या कमी होते. रक्त गोठण्यात प्लेटलेट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कमतरतेमुळे त्वचेवर अचानक निळे किंवा जांभळे ठिपके दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये, वारंवार दिसणारे निळे ठिपके हे नॉन-हॉजकिन लिम्फोमा किंवा रक्ताशी संबंधित इतर समस्यांसारख्या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

जर तुमच्या शरीरावर कोणतीही स्पष्ट जखम नसताना वारंवार निळे डाग दिसत असतील, त्या डागांचा आकार सतत वाढत असेल, तुम्हाला वारंवार नाकातून रक्त येत असेल किंवा रक्तस्त्राव सहज थांबत नसेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर तपासणी केल्याने गंभीर आजार लवकर ओळखता येतात आणि त्वरित उपचार सुरू करता येतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होताच महिलांची नवीन शक्कल; 'या' योजनांसाठी सुरू झाली अर्जांची लाट

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन, 4,500 बसेस धावणार; दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

Veen Doghantali Hi Tutena Video : चोराच्या उलट्या बोंबा! अंशुमन चिंगीवरच करतो घाणेरडे आरोप; स्वानंदी सत्य कसं समोर आणणार?

Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT