तुमच्या वयोमानानुसार तुम्ही कोणतं हेल्थ चेक-अप केलं पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

हेल्थ चेक-अप

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि आजार गंभीर झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात. मात्र नियमित हेल्थ चेक-अप केल्यास शरीरातील अनेक समस्या सुरुवातीलाच ओळखता येऊ शकतात. प्रत्येक वयोगटानुसार शरीराच्या गरजा बदलत असल्यामुळे टेस्ट्सचे नियोजनही वयानुसार करणं आवश्यक आहे.

Blood Circulation

२० ते ३० वयोगट

या वयात अनेकजण स्वतःला पूर्णपणे निरोगी समजतात, पण चुकीच्या सवयी भविष्यात आरोग्यावर परिणाम करू शकतात. या वयोगटातील व्यक्तींनी दर २ ते ३ वर्षांनी एकदा हेल्थ चेक-अप करणं योग्य मानलं जातं. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन आणि गरजेनुसार थायरॉईड टेस्ट करणं महत्त्वाचं असतं.

Weakness In Hands

अनहेल्दी लाइफस्टाइल

जंक फूडचं जास्त सेवन, धूम्रपान किंवा व्यायामाचा अभाव असल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करणं अधिक सुरक्षित मानलं जातं. वेळेवर तपासणी केल्यास भविष्यातील गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

Cardiovascular Health

३० ते ४० वयोगट

या वयात शरीरात हळूहळू बदल सुरू होतात आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे दर १ ते २ वर्षांनी हेल्थ चेक-अप करणं आवश्यक आहे. फास्टिंग आणि PP ब्लड शुगर, लिपिड प्रोफाइल, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट करावी./*

Diabetes And Heart

तणाव आणि कामाचा दबाव

३० ते ४० वयोगटात कामाचा ताण आणि मानसिक तणाव जास्त असतो ज्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. त्यामुळे गरजेनुसार ECG टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. नियमित तपासणीमुळे हृदयाशी संबंधित समस्या सुरुवातीलाच ओळखता येतात.*

Blood Pressure Control

४० ते ५० वयोगट

या वयात मधुमेह, हृदयाच्या समस्या आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे दरवर्षी संपूर्ण हेल्थ चेक-अप करणं खूप महत्त्वाचं ठरतं. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, लिपिड प्रोफाइल, लिव्हर-किडनी टेस्ट तसंच ECG आणि काही वेळा TMT टेस्टही करावी लागते.

Smoking And Heart Disease

५० वर्षांनंतर कोणत्या तपासण्या महत्त्वाच्या

५० वर्षांनंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते आणि अनेक आजारांचा धोका वाढतो. या वयात हार्ट चेक-अप, बोन डेंसिटी टेस्ट, कॅन्सर स्क्रीनिंग तसंच डोळे आणि कानांची तपासणी करणं आवश्यक मानलं जातं.

Liver Function Test

Lemon water: लिंबू पाणी प्यायल्याने एसिडीटी वाढते की कमी होते?

Lemon water | saam tv
येथे क्लिक करा