Diwali Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Weight Loss Tips : दिवाळीत दिसायचंय स्लिम-फिट? असा ठेवा डाएट प्लान, आठवड्याभरात सुटलेलं पोट होईल कमी

Weight Loss Goal : कामाच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे सतत एकाच ठिकाणी बसल्यामुळे वजन वाढणे, पोट पुढे येण यासारख्या समस्या अनेकांना जाणवतात.

कोमल दामुद्रे

Belly Fat Loss :

वाढत्या वजनामुळे हल्ली सगळेच त्रस्त आहेत. कामाच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे सतत एकाच ठिकाणी बसल्यामुळे वजन वाढणे, पोट पुढे येण यासारख्या समस्या अनेकांना जाणवतात. कामामुळे जीमला जाणे किंवा व्यायाम करायला मिळत नाही.

बरेचदा पोटाभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. यामध्ये काहींचे हात पाय हे अगदी बारीक असतात. तर पोटाभोवतीचा भाग आणि मांड्यांच्या भागात अतिरिक्त प्रमाणात चरबी वाढते. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी आपण आहारासोबत व्यायामाकडे देखील लक्ष द्यायला हवे. आपण दिवसभरात किती प्रमाणात कॅलरीज इनटेक करतो. त्यात असणारे फॅट्स आपल्या शरीरावर (Health) कसा परिणाम करतात याकडे देखील लक्ष द्यायला हवे.

जंक फूड, प्रोसेस्ड फूड, गोड पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे चरबी जमा होते. सणासुदीच्या काळात आपल्या प्रत्येकाला स्लिम-फिट दिसायचे असते. अशावेळी काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया

पोटाची चरबी कमी करण्यासाठी डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करा

1. नट्स

नियमितपणे सुकामेवा खाल्ल्यास शरीराला पोषकतत्व मिळते. रात्रभर पाण्यात ड्रायफ्रूट्स भिजत ठेवा. सकाळी दिवसाची सुरुवात भिजवलेल्या सुकामेव्याने करा.

2. प्रोटीनयुक्त नाश्ता करा

सकाळचा नाश्ता हा सगळ्यात चांगला आहार मानला जातो. त्यासाठी नाश्त्यात (Breakfast) हेल्दी पदार्थांचा समावेश करा. डाळींचा डोसा किंवा ओट्ससारख्या पदार्थांचा समावेश करा.

3. तूप

दुपारच्या जेवणात तेलापेक्षा तूप अधिक चांगले समजले जाते. तुपामध्ये असणारे गुणधर्म हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

4. दही

दह्यामध्ये गुड बॅक्टेरियाचा चांगल्या प्रमाणात असतात. त्यासाठी नियमितपणे दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास फायदा होईल.

5. गोड पदार्थ खाणे टाळा

अनेकांना जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु, अशावेळी गोड पदार्थ खाणे टाळा, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्याऐवजी दालचिनी खा.

6. वेळेवर जेवा.

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर जेवणे. कामाच्या गडबडीत बरेचदा आपण वेळेवर जेवण करत नाही. रात्री झोपण्याच्या किमान ३ तासाआधी जेवण करा. तसेच जेवल्यानंतर शतपावली देखील करा.

7. व्यायाम करणे गरजेचे

पुरेशा आहारासोबत व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी काही साधे सोपे व्यायाम करा किंवा योगासने करा. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT