Xiaomi Sale Saam Tv
लाईफस्टाईल

Xiaomi Sale: फेस्टिव्ह सीझनचा धमका! Xiaomi च्या सेलमध्ये स्मार्टफोन टीव्हीवर धमाकेदार ऑफर

Mi Sale : सध्या सणासुदीसोबतच अनेक सेल सुरु होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali with Mi Sale :

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. गणेशोत्सावानंतर नवरात्र आणि दिवाळी असे एकापाठोपाठ सणसमारंभ आहेत. या काळात खूप सेल सुरु होतात. त्यामुळे तुम्हीही काही नवीन इलेक्टॉनिक प्रोडक्ट्स घ्यायचा विचार करत असाल तर दिवाळी सेल तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरेल.

सध्या सणासुदीसोबतच अनेक सेल सुरु होणार आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आणि अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलनंतर आता Xiaomi ने नवीन सेलची घोषणा केली आहे.

नवरात्री पाठोपाठच दिवाळी येणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर या सेलची घोषणा करण्यात आली आहे. Xiaomi ने 'Diwali With Mi' या पेजवर अनेक डिल्सची माहिती आधीच देण्यात आली आहे. Xiaomi या सेलसाठी एक नवीन मायक्रोसाइट सुरु केली आहे. या पेजवरुन स्मार्ट एक्सचेंज, स्मार्ट प्रोटेक्शन,5G स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत.

या सेलमध्ये स्मार्टफोनवरील सर्वोत्तम डील दिली जात आहे. Xiaomi 13 Pro 69,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ज्याची खरी किंमत 5G 89,999 रुपये आहे. याचबरोबर अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यात Redmi 12 5G फोन 11,999 रुपयांना खरेदी करु शकता. या फोनची किंमत 15,999 रुपये आहे.

या सेलमध्ये स्मार्टफोनसोबतच एमआयच्या टीव्हीवर खूप सूट मिळणार आहे. Xiaomi TV A 40 हा टिव्ही 23,999 रुपयांऐवजी 18,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, 43-इंच Xiaomi TV A 43 हा टिव्ही 20,999 रुपयांना खरेदी करु शकता. या टीव्हीची रिअल किंमत 25,999 रुपये आहे. या सेलमध्ये तुम्ही घरात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त किंमतीत विकत घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT