Diwali Recipe 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Recipe 2022 : यंदाच्या दिवाळीत बनवा जाळीदार असे खुसखुशीत अनारसे

दिवाळीच्या फराळात नेहमी चुकणारा पदार्थ हा अनारसे.

कोमल दामुद्रे

Diwali Recipe 2022 : दिवाळीच्या फराळात शेव, चिवडा, चकली, करंजी असे पदार्थ सर्वत्र बनविले जातात. मात्र दिवाळीच्या फराळात नेहमी चुकणारा पदार्थ हा अनारसे त्याचे प्रमाण चुकले की, पदार्थ फसतो. पण तो योग्य प्रमाणात कसा बनवायचा ? चला तर जाणून घेऊ यंदाच्या दिवाळीसाठी (Diwali) खुसखुशीत अनारसेची ही खास रेसिपी. (Latest Marathi News)

साहित्य :

(Rice) / तांदूळ 2 cups

Jaggery - 1 part of rice flour

गूळ - तांदूळ पिठी चा 1 भाग

Poppy seeds / खसखस

Oli for frying / तळण्यासाठी तेल

Ghee / साजूक तूप

अनारसे बनवण्यासाठी खास टिप्स :

  1. तांदूळ जुने वापरावे, इंद्रायणी तांदूळ वापरू नये.

  2. तांदूळ कमीत कमी 3 दिवस 3 रात्र संपूर्ण भिजत घालावेत

  3. रोजच्या रोज तांदूळ मधील पाणी बदलावे

  4. तांदूळ खूप कोरडा सुकवू नये किंवा अगदी ओला नसावा.

  5. तांदूळ पीठ एकदम बारीक दळणे, आणि मैद्याचा चाळणी ने चाळून घ्यावे.

  6. एका वाटीने तांदळाच्या पिठ 3 वाटी घेऊन त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यावा.

  7. गूळ जास्त झाल्यास अनारसे तेलात विरघळतात.

  8. पीठ मळायला खूप जड जात असल्यास थोडेसे साजूक तूप / केळी मिसळावे. ( खूप जास्त नको)

  9. अनारसे तळताना मंद आचेवर तळून घ्यावेत आणि चाळणी वर निथळत ठेवावेत.

कृती -

  • तांदळाच्या पिठ 3 वाटी घेऊन त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यावा. मळून घ्या व लाडू सारखे गोळे तयार करा.

  • तयार गोळे हवाबंद डब्यात १ दिवस ठेवा. डब्याला बाहेरुन सुती कापडात गुंडाळून ठेवा

  • दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला मळून घ्या व पुन्हा हवाबंद डब्यात ठेवा

  • अनारसे बनवताना पिठाचे एकसारखे गोळे तयार करुन घ्या. एका वाटीत साजूक तूप घेऊन एका बाजून खसखसमध्ये फिरवून घ्या.

  • बोटाला साजूक तूप लावून बोटाने गोळा हळूहळू फिरवा. तेल गरम करुन मंद आचेवर तळून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT