Makyacha Chivda Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Makyacha Chivda Recipe : दिवाळीत बनवा खमंग, कुरकुरीत मक्याचा चिवडा; चटपटीत चिवड्याची रेसिपी पाहा

How To Make Perfect Makyacha Chivda : तुम्हालाही परफेक्ट चटपटीत चिवड्याची चव चाखायची असेल तर या पद्धतीने ट्राय करा. पाहूया रेसिपी

कोमल दामुद्रे

Diwali Special Recipe 2023 :

दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून सर्वत्र रोशनाईचे वातावरण दिसत आहे. दिवाळी म्हटलं की, या सणात फराळाचा आस्वाद हमखास चाखला जातो. दिवाळीत कुरकुरीत आणि चटपटीत पदार्थांची मेजवानी पाहायला मिळते. आतेषबाजीसोबतच तिखट-गोड पदार्थ चवीचवीने खाल्ले जातात. दिवाळीच्या (Diwali) फराळात आनंदाने खाला जातो तो चिवडा.

हल्ली चिवड्याचे देखील अनेक प्रकार आहेत. मक्याचा, पोह्याचा, कुरमुरे, ओट्स अशा अनेक प्रकारच्या चिवड्यांची चव चाखायला मिळते. जर तुम्हालाही परफेक्ट चटपटीत चिवड्याची चव चाखायची असेल तर या पद्धतीने ट्राय करा. पाहूया रेसिपी ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • पाव किलो मक्याचे पोहे

  • १ वाटी शेंगदाणे

  • १ वाटी डाळ

  • ४-५ काडी कढीपत्ता

  • १ चमचा तीळ

  • १ चमचा धणे जिरे पूड

  • १/२ चमचा हळद

  • १/२ चमचा हिंग

  • १ चमचा लाल तिखट

  • साखर (Sugar)

  • मीठ

2. कृती

  • सर्वप्रथम कढईत तेल (Oil) गरम करायला ठेवा. तेल कडकडीत तापल्यानंतर कमी फ्लेमवर मका कुरकुरीत तळून घ्या.

  • तळलेला मका कागदात ठेवून त्यातील तेल नितरु द्या. नंतर त्याच तेलात शेंगदाणे, डाळी आणि कढीपत्ता वेगवेगळा तळून घ्या.

  • तळलेले सगळे पदार्थ एकत्रित करुन त्यात धणे पूड, लाल तिखट घाला.

  • नंतर चमचा भर तेलात राई-जिरे, हिंग, तिळ, हळद घालून फोडणी द्या.

  • तयार फोडणी तळलेल्या मिश्रणात घालून चांगले एकजीव करा.

  • वरुन पिठीसाखर आणि लाल तिखट घालून पुन्हा मिश्रण मिक्स करा.

  • तयार आहे कुरकुरीत एकदम टेस्टी मक्याचा चिवडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT