Karanji Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Karanji Recipe : करंजी तेलात सोडताच फुटतेय? मग या टिप्स फॉलो करा, दिवाळीत तुमच्याच फराळाची चर्चा होईल

Diwali Faral : करंजी तेलात तळताना ती तेलात फुटून जाते. असे होऊ नये म्हणून काय करावे याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

दिवाळीसाठी आता फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता प्रत्येक व्यक्तीच्या घरी विविध फराळाचे पदार्थ बनवले जात आहेत. फराळ बनवताना यातील विविध पदार्थांत सर्वात मोठा मान असतो तो करंजीचा. फराळाच्या ताटात लक्ष्मीपूजनावेळी अन्य पदार्थ नसले तरी चालेल मात्र करंजी सर्वात महत्वाची असते. त्यामुळे प्रत्येक घराघरात करंजी बनवण्यास आता सुरुवात देखील झाली असेल.

आता तुम्ही देखील घरी करंजी बनवत असाल. करंजी बनवणे फार सोपं वाटतं. मात्र करंजी तेलात तळणे अनेकांना कठीण जाते. अनेकदा करंजी तेलात तळताना ती तेलात फुटून जाते. असे होऊ नये म्हणून काय करावे याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

करंजी बनवताना या चूका टाळा

करंजी बनवताना त्याच्या कडा छान एकमेकांना चिकटाव्यात यासाठी पीठ म्हणजेच कणीक चांगली मळणे महत्वाचे आहे. अनेक व्यक्ती कणीक चुकीच्या पद्धतीने मळतात.

कणीक मळताना त्यात तुपाचे मोहन घ्या. तूप नसल्यास तुम्ही तेलाचे मोहन सुद्धा यासाठी वापरू शकता. याने कणीक अगदी मऊ भिजली जाते.

कणीक चिकट असावी यासाठी काही महिला त्यात जास्तीचे पाणी मिक्स करतात. मात्र जास्त पाणी टाकल्याने कणीक आणखी जास्त कडक होते. तसेच ते पीठ तेलात गेल्यानंतर फुलत नाही.

करंजी बनवताना त्यात सारण भरावे लागते. शक्यतो सर्व व्यक्ती यामध्ये नारळाचेच सारण भरतात. त्यामुळे सारण भरून झालं की त्याच्या कडा निट दाबून घ्या.

सारणामध्ये रवा देखील असतो. रवा तेव्हा आपण जिथे कडा दाबणार आहोत तेथे येतो तेव्हा त्या बंद होत नाहीत. कडा उघड्याच राहतात आणि तेलात गेल्यावर पूर्ण करंजी खुली होते.

करंजी बनवताना कणीक काही व्यक्ती दुधात मळतात मात्र तसे करू नका. त्याने कणीक आणखी कडक होते.

फक्त कडा बंद करताना दुधाचा हात घ्यावा. त्यामुळे करंजी तेलात उघडी होत नाही.

करंजी तळताना तिला जास्त उष्णतेची गरज नसते. त्यामुळे करंजी तळत असताना गॅस मंद आंचेवरच ठेवा. गॅस जास्त फास्ट ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Traditions : मंगळसूत्रात काळे मणीच का असतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व

UP Election 2027: १३०मधून फक्त २६ जागा,काँग्रेसच्या हातातून अमेठी-रायबरेलीही काढलं! युपीमध्ये सपाचा मोठा गेम प्लॅन

Maharashtra News Live Update: पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते दगडूशेठ बाप्पाची आरती

New Rules December 2026: १ डिसेंबरपासून खिशाला बसणार फटका? SBI कार्डपासून गॅस सिलिंडरपर्यंत ७ मोठे बदल

8 राज्यात जोरदार पाऊस, ८० किमी वेगाने वादळी वारे अन् दाट धुकं; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

SCROLL FOR NEXT