Diwali 2024 gifts saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2024: दिवाळीत करु नका 'या' भेटवस्तु देण्याचा प्लॅन अन्यथा...

do not gift : आपण मित्र-परिवाराला आणि कुटुंबाला दिवाळीत भेटवस्तु देतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्हीला सतत पैशांची अडचण येत असेल तर दिवाळीला तर काही भेटवस्तु देणे टाळा. त्याने तुमची समस्या दूर होवू शकते. दिवाळी म्हंटले की, एकमेकांना भेटवस्तु देणे होतेच. मात्र काही भेटवस्तु दिल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

आपण मित्र-परिवाराला आणि कुटुंबाला दिवाळीत भेटवस्तु देतो. त्यावेळेस आपल्याला वाटेल त्या गोष्टी किंवा खिशाला परवडतील अशा भेटवस्तु आपण एकमेकांना देत असतो. मात्र त्यावेळेस आपल्यावर पैशाचे आर्थिक संकट ओढवू शकते. त्यासह तुमच्यावर वाईट प्रसंग ओढवू शकतो. लक्ष्मी तुमच्यावर नाराज होवू शकते. त्यामुळे दिवाळीत कोणत्या भेटवस्तु द्याल हे जाणून.

घड्याळ - दिवाळीला तुम्ही कोणालाही घड्याळ भेट देवू नका. त्याने तुमच्या आयुष्यातील चांगला काळ निघून जावू शकतो. घड्याळ हे आपल्या आयुष्याचा कमी होत चाललेला काळ दर्शवते. त्याने नकारात्मकता वाढते.

काळ्या रंगाचे कपडे- दिवाळीला कोणीही काळा रंग परिधान करत नाही. तसेच काळ्या वस्तुंची देवाण-घेवाण दिवाळीत केली जात नाही. त्यामुळे काळे कपडेही भेट म्हणून कोणाला देवू नका.

धारदार वस्तु- स्वयंपाक घरातील वस्तु असो वा रोजच्या वापरातली, तुम्ही दिवाळीला या वस्तु कोणालाही भेट म्हणून देवू नका.

चांदीचे किंवा सोन्याचे नाणे- बऱ्याच वेळेस तुम्ही दिवाळीत सोने जास्त प्रमाणात खरेदी करता. मात्र तुम्ही खरेदी केलेले सोने किंवा चांदीचे नाणे भेट म्हणून कोणाला देणे टाळावे. जर तुम्ही अशा भेटवस्तु देत असाल तर तुम्ही तुमची लक्ष्मी दुरऱ्याच्या हातात देताय असे समजले जाते.

आंबट पदार्थांची भेट- दिवाळीला तुम्ही कोणतेही आंबट किंवा लिंबू वर्गीय पदार्थ खरेदी करु नये. त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर क्रोधीत होवू शकतात. त्याने तुमच्यावर आर्थिक संकट येवू शकते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Written By: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT