Diwali Date 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Date 2023 : वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या योग्य तिथी

Diwali Festival Date 2023 : यंदा दिवाळी सण कधी आहे? वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाची योग्य तिथी कधी? जाणून घेऊया सविस्तर

कोमल दामुद्रे

Diwali Tithi 2023 :

दिवाळी म्हटलं की, आपल्याला सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. या दिवसात फटाके, रांगोळी आणि दिव्यांची आरास पाहायला मिळते. हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे.

वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाश आणि निराशेवर आनंद म्हणून दरवर्षी दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. दीपावली हा सण दिव्यांचा आरास म्हणून ओळखला जातो. पाच दिवसांच्या या सणात प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व असते. भगवान राम आणि देवी सीता १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते. यंदा दिवाळी सण कधी आहे? वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाची योग्य तिथी कधी? जाणून घेऊया सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल द्वितीया तिथी पर्यंत दिवाळी (Diwali) हा सण साजरा (Celebrate) केला जाईल. पूर्वीच्या काळी हा सण यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिवाळी सण (Festival) मानला जातो.

1. २०२३ मधील दिवाळी

  • वसुबारस - आश्विन कृष्ण पक्ष एकादशी - गुरुवार ९ नोव्हेंबर, २०२३ (रमा एकादशी, गोवत्स द्वादशी)

  • धनत्रयोदशी - आश्विन कृष्ण द्वादशी - शुक्रवार १० नोव्हेंबर, २०२३ (गुरुद्वादशी, धन्वंतरी जयंती, यमदीपदान)

  • नरक चतुर्थी - आश्विन कृष्ण चतुर्दशी - रविवार १२ नोव्हेंबर, २०२३

  • लक्ष्मीपूजन - आश्विन कृष्ण चतुर्दशी - रविवार १२ नोव्हेंबर, २०२३ अभ्यंगस्नान (अमावास्या प्रारंभ दुपारी २. ४४ मि)

  • बलिप्रतिपदा - कार्तिक शुक्ल प्रतिपदा - मंगळवार १४ नोव्हेंबर, २०२३ कार्तिक मासारंभ

  • दीपावली पाडवा - कार्तिक शुक्ल प्रतिपदा - मंगळवार १४ नोव्हेंबर, २०२३

  • भाऊबीज - कार्तिक शुक्ल द्वितीया - बुधवार १५ नोव्हेंबर, २०२३ यमद्वितीया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT