Diwali 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023: दिवाळीत फटाके खरेदी करताय? प्रदुषण रोखण्यासाठी अशी घ्या काळजी

Diwali: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरीकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali Guideline For Firecrackers:

दिवाळीला काही दिवसात उरले असून खरेदीसाठी नागरीकांची गर्दी दिसत आहे. बाजारात फराळ, कंदील, फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक विभागात फटाके विक्रीच्या स्टॉलला परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे पालन करुन हे स्टॉल लावण्यास परवानगी दिली आहे.

फटाक्यांची विक्री आणि खरेदी करताना काळजी घ्यावी. तसेच 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांची विक्री करु नये अशी सूचना देण्यात आली आहे. फटाके फोडताना आरोग्यासह इतरांना इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

फटाके विक्री खरेदी करण्याबाबात काही नियम आखले आहेत. त्या नियमांचे नागरीकांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात सुरक्षित ठिकाणी स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. फटाका विक्रत्यांनी आग लागू नये याची काळजी घ्यावी.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहान महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले. तसेच फटाके विक्रेते आणि नागरीकांनीही नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

फटाके विक्रेत्यांनी ही काळजी घ्यावी.

  • सुरक्षित ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावावे.

  • स्टॉलमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करावी.

  • सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

  • 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज होणाऱ्या फटाक्यांची विक्री करु नये.

फटाके खरेदी करताना ही काळजी घ्यावी.

  • जास्त आवाजाचे फटाके विकत घेऊ नये.

  • जुने फटाके विकत घेऊ नये. त्याने हानी पोहचू शकते.

  • फटाक्यांमुळे कुठेही आग लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.

  • आवाजांमुळे आजूबाजूच्या आणि ज्येष्ठ नागरीकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

SCROLL FOR NEXT