ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोन्याच्या किमती वाढल्यामुळे अनेक महिला इतर दागिन्यांकडे वळत आहेत. प्लॅटिनम दागिने हे त्यापैकी एक आहे. आजकाल बाजारात प्लॅटिनमच्या दागिन्यांना खूप मागणी आहे.
ऑफिसला जाणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये प्लॅटिनमचे दागिने घालण्याची क्रेझ निर्माण झालीय. प्लॅटिनम दागिने कोणत्याही कपड्यांना एक उत्कृष्ट लूक देतात. आज आम्ही तुमच्यासाठी प्लॅटिनम दागिन्यांच्या अशा काही डिझाईन्स घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही तुमच्या ऑफिस वेअरसोबत घेतल्यास तुम्हाला एक परिपूर्ण फॉर्मल लूक मिळेल.
प्लॅटिनम बाली इयररिंग्स ऑफिस वेअरसाठी परिपूर्ण आहेत. ते कॅरी करायला सोपे आहेत. ते घालल्याने कान दुखणे किंवा दुखापत देखील होत नाही. हे डिझाईन्स तुमच्या लूकला उत्कृष्ट बनवलीतल.
या प्रकारच्या रिंग्ज आजकाल महिलांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. हे डिझाईन्स तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवत आहेत.
तुमच्या मनगटांचे सौंदर्य वाढवण्यासाठी, तुम्ही यासारखे प्लॅटिनम ब्रेसलेट घालू शकता. या डिझाईन्स खूप हलक्या असतात आणि तुच्या बजेटमध्ये येणाऱ्या आणि परवडणाऱ्या किमतीत मिळतात.
या प्रकारच्या पेंडंट आणि इयररिंग सेट डिझाइन्स आजकाल खूप लोकप्रिय होत आहेत. या प्रकारच्या प्लॅटिनम दागिन्यांमुळे फॉर्मल लूक खास बनत असतात.