युद्धाचा भडका! एकाच वेळी १२ ठिकाणी हल्ले, पाकिस्तानचे १० सैन्य ठार; ३७ बंडखोरांचाही खात्मा

BLA Attack In Balochistan Multiple Cities: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बीएलएने एकाच वेळी अनेक शहरांमध्ये हल्ले करत सुरक्षा दलांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये 10 पोलिसांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.
Security forces deployed on high alert after coordinated BLA attacks across multiple cities in Pakistan’s Balochistan province.
Security forces deployed on high alert after coordinated BLA attacks across multiple cities in Pakistan’s Balochistan province.Saam Tv
Published On

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बलुच विभाजनवादी संघटना बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने एकाच वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 10 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. यालाच प्रतिउत्तर देत 37 बंडखोरांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलानी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी क्वेटा, पसनी, मस्तुंग, नुश्की आणि ग्वादर या बलुचिस्तानमधील पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये जवळपास एकाच वेळी गोळीबार आणि बॉम्बने हल्ला केला. यामध्ये क्वेटामधील परिस्थिती भयानक होती. या ठिकाणी चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Security forces deployed on high alert after coordinated BLA attacks across multiple cities in Pakistan’s Balochistan province.
Shocking : सूनेचं प्रेमप्रकरण कळलं, सासरा अडवायला लागला; तिनं बॉयफ्रेंडला गळ घातली अन् शेवट झाला भयंकर

BLA ने स्वीकारली जबाबदारी

या हल्ल्यांची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. संघटनेने सांगितले की, लष्करी तळ, पोलीस दल आणि नागरी प्रशासनातील अधिकारी हे त्यांचे लक्ष्य होते. अहवालानुसार, BLA ने या हल्ल्यांद्वारे आपल्या तथाकथित ‘ऑपरेशन हेरोफ’च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केल्याचीही घोषणा केली आहे. यापूर्वीही मातृभूमीच्या रक्षणाच्या नावाखाली नव्या हल्ल्यांची तयारी सुरू असल्याचा दावा संघटनेने केला होता.

Security forces deployed on high alert after coordinated BLA attacks across multiple cities in Pakistan’s Balochistan province.
Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

हल्ल्यांनंतर संपूर्ण बलुचिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली असून, संवेदनशील भागांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी कोणत्याही सामान्य नागरिकांच्या मृत्यूची नोंद नाही.

Security forces deployed on high alert after coordinated BLA attacks across multiple cities in Pakistan’s Balochistan province.
Supreme Court : शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

पाकिस्तानचा खनिज संपत्तीने समृद्ध असलेला बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा हिंसक कारवायांनी हादरला आहे. गेल्या काही दशकांपासून बंडखोरीच्या आगीत होरपळणाऱ्या या भागात अलीकडच्या काळात हल्ल्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, मार्च २०२५ मधील रेल्वे हायजॅकच्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. बलुचिस्तान हा नैसर्गिक वायू आणि दुर्मिळ खनिजांच्या बाबतीत पाकिस्तानचा सर्वांत संपन्न प्रांत आहे. मात्र इतकी संपत्ती असूनही हा भाग विकासाच्या बाबतीत अत्यंत मागे राहिला आहे. बलुच समाजाने सातत्याने केंद्र सरकारवर राजकीय उपेक्षा आणि आर्थिक शोषणाचे आरोप केले आहेत. आमची संपत्ती ओरबाडली जात आहे, मात्र त्याबदल्यात आम्हाला केवळ गरिबी आणि सुरक्षा दलांचा जाच मिळत आहे, अशी तीव्र भावना येथील नागरिकांमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com