Mobile Safety Tips: हॅकर्सच्या निशाण्यावर तुमचा स्मार्टफोन? फोनला सुरक्षित कसं ठेवाल? जाणून घ्या टिप्स

Mobile Safety Tips: भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे.
Mobile Safety Tips
Mobile Safety TipsSaam tv
Published On

CERT-In Update:

भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. तुमच्या जुन्या फोनमध्ये ओएस सिस्टम व्हर्जन असेल तर तुमचा स्मार्टफोन हॅक होऊ शकतो. तसेच CERT-In (Computer Emergency Response Team)ने अॅपल युजर्ससाठीही महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. (Latest Marathi News)

CERT-In ने १४ ऑक्टोबर रोजी या सूचना जाहीर केल्या आहेत. या टीमने Apple iOS आणि iPad OS युजर्सना सावध केले आहे. त्यांना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CERT-In म्हणजे काय?

'आज तक'च्या वृत्तानुसार, CERT-In म्हणजे 'मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इनफार्मेशन टेक्नोलॉजी' या अंतर्गत येणारी एजन्सी आहे. ही सरकारी एजन्सी सायबर सुरक्षासंदर्भात प्रकरणे हाताळते.

ही एजन्सी इंटरनेटवरील सर्व बाबींवर नजर ठेवण्याचं काम करते. ही एजन्सी युजर्सना सावधान करण्याचं काम करते. सध्या या सरकारी एजन्सीने iOs आणि iPad os या युजर्सना सतर्क केलं आहे.

हॅकर्सच्या निशाण्यावर स्मार्टफोन

हॅकर्सच्या निशाण्यावर आता भारतीयांचे स्मार्टफोन असल्याचे बोललं जातंय. या हॅकर्सकडून मोबाइलचं संपूर्ण नियंत्रण मिळवलं जातं. तुमच्या मोबाइलचं रिमोट एक्सेस मिळविण्यासाठी तुम्हाला छुप्या पद्धतीने परवानगी मागितली जाते. (Mobile Safety Tips)

Mobile Safety Tips
Amazon-Flipkart Sale: 11.35 इंचाचा डिस्प्ले, 8GB रॅम, 256GB स्टोरेज; OnePlus च्या Tablet वर मिळत आहे जबरदस्त सूट

तुमचा मोबाइल हा iPhone , iPad किंवा ऑपरेटिंग सिस्टम १६.७.१ असेल तर सतर्क राहणं गरजेचं आहे.

तुम्हाला फोन सुरक्षित ठेवायचा असेल तर मोबाइल अपडेट करावा लागेल. सरकारी एजन्सीने या युजर्सना सेक्युरिटी अपडेट करण्यास सांगितलं आहे. अॅपलनेही सर्वात आधी सेक्युरिटी अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तुम्ही अपडेट केला नाही तर तुमचा मोबाइल सुरक्षित नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mobile Safety Tips
OnePlus Pad Go सेल सुरू, 8000mAh बॅटरीसह दमदार फीचर्स! मिळवा हजारोंचा डिस्काउंट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com