घरातून राजकारणाचं बाळकडू, वडील स्वातंत्र्य सैनिक तर भाऊ माजी मंत्री; कसा आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास?

sunetra pawar takes oath as dcm : सुनेत्रा पवार यांना घरातून राजकारणाचं बाळकडू मिळालं. जाणून घ्या सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास
घरातून राजकारणाचं बाळकडू, वडील स्वातंत्र्य सैनिक तर भाऊ माजी मंत्री; कसा आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास?
Published On
Summary

सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आटोपला उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी

सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

अजित पवारांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यपाल आचार्य देव्रवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर धाराशिवच्या तेर गावातील लोकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत. अजित पवारांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवार यांना बालपणीच राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. जाणून घ्या सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास

सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यातील संत गोरोबाकाकांची पावनभूमी असलेले तेर गाव हे आहे. त्यांचे वडील मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिक होते. तर त्यांचे बंधू माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी दीर्घकालीन राजकारण केलं आहे. सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या बंधूंना लहानपणापासून जवळून पाहिलं आहे. राजकीय घराण्यामुळे समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू आपोआपच प्राप्त झालं.

अन् हजार पक्षांची पोल्ट्री लाखावर नेली

सुनेत्रा पवार या शेतीच नाही, तर आधीची दहा हजार पक्षांची पोल्ट्री त्यांनी एक लाखांवर नेली. अजितदादांनी सुरू केलेल्या शारदा दूध डेअरीत लक्ष घालून दूध संकलन वाढवलं. लग्नानंतर ५ वर्षांत अजितदादांचं राजकारण विस्तारत गेलं. पुढे त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी येऊन पडली. त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

घरातून राजकारणाचं बाळकडू, वडील स्वातंत्र्य सैनिक तर भाऊ माजी मंत्री; कसा आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास?
आयकर विभागाने छापा टाकला; प्रसिद्ध उद्योजकाने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

अजितदादा हे १९९१ साली खासदार झाले. पुढे तीन महिन्यातच आमदार झाले. तसेच मंत्रिही झाले. त्यामुळे अजितदादासोबत सुनेत्रा पवार या मुंबईला वास्तव्यास गेल्या. विद्या प्रतिष्ठाणची विद्यानगरी उभारणीवेळी अजित पवार बऱ्याचदादा रुईच्या माळराणावर ठाण मांडून असायचे. अजित पवार यांचा दुपारचा जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रा पवार घेऊन यायच्या. या संपूर्ण उभारणीच्या कामाच्या साक्षीदार व्हायच्या.

घरातून राजकारणाचं बाळकडू, वडील स्वातंत्र्य सैनिक तर भाऊ माजी मंत्री; कसा आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास?
निवडणुकीच्या रणधुमाळीत वादग्रस्त प्रचार; मंत्री भरणेंच्या निकटवर्तीय उमेदवाराच्या Whatsapp स्टेटसमुळे नागरिकांमध्ये संताप

त्यावेळी रुई आणि जनतेशी जवळून संपर्क आला होता. पुढे विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त झाल्या. तरीही त्या विद्यानगरीच्या उभारणीच्या कामात सहभागी होत्या. राज्यातील शासनाच्या स्वच्छता अभियानात सुनेत्रा पवार यांचा मोलाचा सहभाग होता. त्यावेळी काटेवाडी गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांनी निर्मल ग्रामची चळवळ यशस्वी करण्यात मोठा सहभाग नोंदवला. कोणतेही पद नसतानाही संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान त्यांनी दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com