How To Stop Digital Payment Scam Saam Tv
लाईफस्टाईल

QR Code आणि UPI च्या स्कॅमिंगला तुम्हीही बळी पडलात? Cyber Fraud ला सरकार कसा बसवणार आळा, वाचा एका क्लिकवर

How To Stop Digital Payment Scam : भाजीपाल्यापासून ते किराणामालाच्या दुकांनात आपण सहज QR Code Scan करतो. परंतु, यामार्फत आजही अनेकदा स्कॅमिंग होताना दिसून येत आहे. अनेकांना मेसेजद्वारे UPI आयडीची लिंक पाठवून किंवा OR कोड पाठवून फसवणूक केली जाते. सरकार आता या स्कॅमिंगवर मोठा निर्णय घेणार आहे.

कोमल दामुद्रे

Digital Payment Scam :

वाढत्या तंत्रज्ञानानुसार डिजिटल पेमेंटचा अधिक प्रमाणात वापर होताना दिसून येत आहे. सध्याच्या ऑनलाइन युगात फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या युपीआय आयडीचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसून येतो.

भाजीपाल्यापासून ते किराणामालाच्या दुकांनात आपण सहज QR Code Scan करतो. परंतु, यामार्फत आजही अनेकदा स्कॅमिंग होताना दिसून येत आहे. अनेकांना मेसेजद्वारे UPI आयडीची लिंक पाठवून किंवा OR कोड पाठवून फसवणूक केली जाते. सरकार आता या स्कॅमिंगवर मोठा निर्णय घेणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यूपीआय सेवा पुरवणारी 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCI) या सरकारी कंपनीशी वित्त मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.

1. स्कॅम कसे होते?

स्कॅमर्स (Scam) तुमची फसवणूक करण्यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब करतात. यासाठी ते लॉटरी किंवा अधिक पैसे (Money) मिळणार असा एसएमएस पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर खाते हॅक केले जाते. QR Code स्कॅन करताच खात्यातून पैसे गायब होतात. यासाठी सरकार लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

2. कारवाई कशी केली जाईल?

सर्व सरकारी एजन्सी डिजिटल पेमेंट्स (Payment) अतिरिक्त सुरक्षित करण्यासाठी आणि स्कॅमर दूर करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. सरकार यावर लवकरच डिजिटल माध्यमातून मोठा पेमेंट व्यवहार करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा असण्यावर भर देणार आहे.

सध्या UPI द्वारे पेमेंट करताना तुम्हाला स्कॅन केल्यानंतर तुमचा पिन कोड टाकावा लागतो. परंतु, लवकरच ठराविक रकमेपेक्षा जास्त पेमेंट केल्यावर तुम्हा OTP क्रमांक टाकावा लागेल. यामध्ये काही बँकानी एटीएमसाठी अशी सुविधा सुरु केली आहे. तसेच सरकार डिजिटल पेमेंट अॅप्समध्ये काही वैशिष्ट्य जोडण्याचा विचार करत आहे. ज्या मार्फत सिम क्लोनिंग आणि बनावट QR Code ओळखता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT