heart attack warning signs google
लाईफस्टाईल

Breathing Problems: रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रास होतोय अन् वजनही वाढतंय? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Heart Attack Signs: रात्री झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हे हृदयविकाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळेवर उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

रात्री श्वास घ्यायला त्रास होणं हे हार्ट अटॅकचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

छातीत दडपण, थकवा आणि वजन वाढ याकडे दुर्लक्ष करू नये.

तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येतात.

आपले हृदय हे शरीराचे पॉवरहाऊस आहे. ते सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांनी रक्त पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. पण जेव्हा हृदय हे कार्य व्यवस्थित करू शकत नाही, तेव्हा शरीर आपल्याला इशारा देण्यासाठी काही लक्षणे दाखवायला सुरुवात करतात. ही लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वेळीच ओळखल्यास हार्ट अटॅक किंवा कार्डिओमायोपॅथीसारख्या गंभीर आजारांपासून तुमचा जीव वाचू शकतो.

पहिले लक्षण

चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटणे. मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्यास असे होते. काही वेळा डोळ्यासमोर अंधुक दिसणे हेही त्याचे लक्षण असते.

दुसरे लक्षण

झोप न लागणे. रात्री वारंवार खोकल्यामुळे जाग येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वारंवार लघवीला जाणे ही लक्षणे हृदयाच्या कार्यक्षमतेतील घट दर्शवतात.

तिसरे लक्षण

छातीत अस्वस्थता किंवा दडपण जाणवणे. हृदयात घट्टपणा, दाब किंवा वेदना जाणवणे हे हृदयाला मर्यादित रक्तपुरवठ्याचे संकेत असू शकतात. ही लक्षणे हार्ट अटॅकच्या आधी दिसणाऱ्या चिन्हांपैकी एक असू शकतात.

चौथे लक्षण

चौथे म्हणजे व्यायाम किंवा दैनंदिन काम करण्याची क्षमता कमी होणे. पूर्वी सहज करता येणाऱ्या गोष्टी करताना करताना थकवा जाणवणे हे हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्याचे लक्षण असू शकते.

पाचवे लक्षण

अचानक वजन वाढणे हेही एक महत्त्वाचे संकेत आहे. कमी वेळात दोन ते तीन किलो वजन वाढल्यास ते चरबीमुळे नसून शरीरात द्रव साठल्यामुळे असू शकते. हे हृदय प्रभावीपणे रक्त पंप न केल्याचे आणि शरीरात पाणी टिकून राहिल्याचे लक्षण आहे.

सहावे लक्षण

सतत खोकला येणे किंवा घरघर होणे हे फुफ्फुसांमध्ये द्रव जमा झाल्याचे लक्षण असू शकते. जे अनेकदा हृदयविकारामुळे होते. जर खोकल्यासोबत श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT