Watermelon Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Watermelon Side Effects : मधुमेहींनो, उन्हाळ्यात कलिंगड खाताय ? आधी कॅलरीज तर जाणून घ्या

How Much Calories in One Watermelon : एका कलिंगडात किती असतात कॅलरीज, त्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते का ?

कोमल दामुद्रे

Diabetes Health : उन्हाळ्यात सर्वत्र आपल्याला लालसर असे कलिंगड हमखास पाहायला मिळते. पाहाताच क्षणी त्याला खाण्याचा मोह काही आपल्याला आवरता येत नाही. कमी कॅलरी, चरबी व उन्हाळ्यात शरीरात इलेक्ट्रोलाइट्स मानले जाणारे फळ आहे.

कलिंगड हे हृदयाच्या (Heart) आरोग्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती व पचनासाठी उत्तम फळ मानले जाते. तसेच वजन कमी करण्यासाठी व डिहायड्रेशनची समस्या यांवर देखील मात करते. पण कलिंगडाचे जितके फायदे आहेत त्यापेक्षा जास्त नुकसान. वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचे सेवन करताय तर त्याच्यात असणाऱ्या कॅलरीजबद्दल देखील जाणून घ्या

1. एका कलिंगडात किती असतात कॅलरीज

कलिंगडात असणारी कॅलरीज (Calories) ही त्याच्या आकार व वजनानुसार बदलते. indianexpress.com शी बोलताना डॉ जी सुषमा यांनी सांगितले की, साधारणपणे एका कलिंगडमध्ये सुमारे 15 पौंड किंवा 6.8 किलोचे असते. त्यात कॅलरीज 1,200, कर्बोदके 300 ग्रॅम, प्रथिने 30 ग्रॅम, फायबर 12 ग्रॅम असते तर हे व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन ए , पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लाइकोपीनचा समृद्ध असा स्त्रोत आहे.

2. कलिंगडाचे फायदे (Benefits)

1. हायड्रेशन

कलिंगडमध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे उन्हाळ्यात ते शरीराला हायड्रेट ठेवते. हायड्रेट राहिल्यास शरीराचे आरोग्य सुरळीत राहाते.

2. वजन कमी करण्यास

कलिंगड खाल्ल्याने पोट भरलेले राहाते त्यामुळे आपल्या भूक लागत नाही. तसेच पचनासाठी हलके असल्यामुळे वजन कमी करण्यासोबतच बध्दकोष्ठतेचा त्रास टाळता येतो.

3. रोगप्रतिकारशक्ती

टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन यांसारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात आणि निरोगी रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतात.

3. मधुमेही रुग्ण किती प्रमाणात कलिंगड खाऊ शकतात?

मधुमेही रुग्ण कलिंगडाचे सेवन तर करू शकतात, परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्यांनी ते कमी प्रमाणात करावे. कलिंगडच्या एका फोडीत अंदाजे १५० ग्रॅम असतो ज्यामध्ये 7 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. त्यासाठी कार्बोहायड्रेटचे प्रमाण विचारात घेऊन त्याचे सेवन करा अन्यथा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : . भुसावळ शहरात आज श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

SCROLL FOR NEXT