Diabetes Tips : मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्यावी लागते. या आजारासोबत जगणे कठीणच. रुग्णाला नेहमी खाण्यापिण्यात नियंत्रण ठेवावे असा सल्ला डॉक्टर नेहमी देत असतात.
रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यास हृदय आणि किडनीच्या आजाराचा धोका निर्माण होतो. आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींबाबत जागरुक राहिल्यास आपण आरोग्य बिघडण्यापासून वाचू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी फायबर आणि प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास, इतर अनेक पोषक घटक साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकतात.
'ही' Herbal Tea नियमित प्या
ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणार्या प्रख्यात आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी ZEE NEWS ला सांगितले की, तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात साखर, जास्त कॅलरी असलेले अन्न आणि ट्रान्स फॅट टाळावे. एक खास आयुर्वेदिक गोष्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, ती म्हणजे दालचिनी. हा मसाला पाककृतींची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. दालचिनीसह हर्बल चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधापेक्षा कमी नाही.
मधुमेहामध्ये दालचिनी फायदेशीर आहे
दालचिनीमध्ये अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
जर तुम्ही हा हर्बल चहा रोज एकदा तरी प्यायला तर रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होईलच, उलट रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलही कमी होण्यास सुरुवात होईल.
अशा स्थितीत हृदयविकाराचा धोकाही कमी होईल.
ज्या लोकांना टाईप-2 मधुमेह नाही त्यांनीही रोज एकदा दालचिनीचा चहा प्यावा कारण त्यामुळे मधुमेहाचा (Diabetes) धोका कमी होतो आणि हृदयविकारापासून आपले संरक्षण होते.
दालचिनी चहा कसा तयार करायचा?
दालचिनीचा चहा तयार करणे खूप सोपे आहे.
तुम्ही ते घरी बनवू शकता, यासाठी तुम्हाला अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि चिमूटभर दालचिनी पावडर घ्या आणि एका भांड्यात कपभर पाण्यात उकळा.
पाणी उकळल्यावर गॅस स्टोव्ह बंद करा.
आता त्यात एक चमचा ग्रीन टी मिक्स करून भांडे ५ मिनिटे झाकून ठेवा. शेवटी चहा गाळून प्या.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.