Diabetes Rules : मधुमेहींनो, वाढत्या थंडीत 'या' 5 नियमांचे पालन करा; अन्यथा...

उच्‍च कॅलरीयुक्‍त पदार्थांचे सेवन मधुमेहांसाठी चांगले नाही.
Diabetes Rules
Diabetes RulesSaam Tv

Diabetes Rules : मधुमेंहीच्या रुग्णांना कोणत्याही ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घेण गरजेचे आहे. येणारा नाताळ सण हा अनेक उत्साहाचे क्षण घेऊन येतो. हे क्षण साजरे करताना अनेक गोडाचे पदार्थ व तळलेले पदार्थ खाल्ले जातात.

यंदा सुट्टीच्‍या हंगामामध्‍ये खूप धमाल करायला मिळणार असली तरी असे उच्‍च कॅलरीयुक्‍त पदार्थांचे सेवन मधुमेहांसाठी (Diabetes) चांगले नाही. जगातील डायबिटीज कॅपिटल म्‍हणून अनेक लोकांना या दुविधेचा सामना करावा लागू शकतो, जेथे ते आरोग्‍यासाठी सिरप-लॅडेन किंवा तळलेले पदार्थ सेवन करणे टाळतात आणि योग्य स्नॅक्सचे सेवन करतात. पण आहाराचे योग्‍यरित्‍या नियोजन केले असले तरी सर्वांनाच त्‍याचे काटेकारपणे पालन करणे जमत नाही, ज्‍यामुळे अनेकांना एक किंवा दोन गोड पदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नाही.

Diabetes Rules
Diabetes Risk : सावधान ! लाईटमुळे वाढतोय मधुमेहाचा धोका; रिचर्समधून कारण आले समोर

मुंबई येथील ग्‍लोबल हॉस्पिटल्‍सच्‍या कन्‍सल्‍टण्‍ट डायबिटोलॉजिस्‍ट डॉ. मिता साहा म्हणतात, साधारणपणे सणासुदीच्या हंगामानंतर मधुमेह असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. काहीजण मिठाई सेवनासंदर्भात अतिरेक करतात आणि काहीजण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी येतात.

दीर्घकालीन गुंतागूंत टाळण्यासाठी आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी याबाबतीत योग्यरित्या व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. आज, ग्लुकोज मॉनिटरिंग डिवाईसेस आहेत, जे लोकांना सतत अद्ययावत ग्लुकोज पातळी ट्रेंडमध्ये मदत करतात, मधुमेह असलेल्या लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि योग्य टाइम-इन-रेंज (टीआयआर)मध्‍ये राहण्यास मदत करतात.

यंदाच्‍या सणासुदीच्‍या हंगामामध्‍ये तुमच्‍या शरीरामधील ग्‍लुकोज पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी ५ सूचना:

१. आरोग्‍यदायी आहार

तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जाण्यापूर्वी काय खाणार याची योजना तयार करा. फॅट्स, साखर व मीठ यांचे सेवन मर्यादित करा आणि कर्बोदकांच्‍या सेवनावर लक्ष ठेवा. दिवसभरात थोड्या प्रमाणात भोजन करा. मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आहार संतुलित आणि पौष्टिक राहील याची खात्री घ्‍या, डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्‍ला घ्‍या. हे देखील लक्षात ठेवा की जेवण वगळून इतर खाद्यपदार्थांचे मनसोक्‍त सेवन करू नका, कारण यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण धोकादायकरित्‍या कमी-जास्‍त होऊ शकते.

२. रक्‍तातील शर्करेमध्‍ये होणाऱ्या कमी-जास्‍त प्रमाणाकडे लक्ष ठेवा

सुट्टीच्‍या हंगामामध्‍ये तुमची जीवनशैली (Lifestyle) व आहारामध्‍ये बदल होतात, ज्‍यामुळे नियमितपणे रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणावर देखरेख ठेवणे आवश्‍यक आहे. फ्रीस्‍टाइल लिब्रे सिस्टमसारखे ग्‍लुकोज मॉनिटरिंग डिवाईस जवळ असल्‍यास तुम्‍हाला या पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍यास मदत होऊ शकते. फिंगर प्रिक्‍ससाठी सुलभ व वेदनारहित पर्याय म्‍हणून हे डिवाईसेस वेअरेबल सेन्‍सर्स वापरतात, ज्‍यामुळे तुम्‍हाला रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणावर देखरेख ठेवण्‍यास मदत होते. यामधून तुम्‍हाला धोकादायक आजार टाळण्‍यासाठी किंवा त्‍यासंबंधी काळजी घेण्‍यासाठी उत्तम सुविधा मिळू शकते.

३. झोपेचे नियमित व्‍यवस्‍थापन करा

पार्टीमुळे कधी-कधी रात्री उशीर होतो, ज्‍यामुळे पुरेशा झोपेच्‍या प्रमाणावर परिणाम होतो. वेळ काढून झोपेचे वेळापत्रक तयार करा, दिवसातून किमान सात ते आठ तास झोप मिळणे गरजेचे आहे. डुलकी घेतल्‍यास तुम्‍हाला मधुमेहावर उत्तमप्रकारे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होऊ शकते.

४. व्‍यायाम करा

नियमितपणे व्‍यायाम करत सक्रिय राहिल्‍याने मधुमेहाचे उत्तमरित्‍या व्‍यवस्‍थापन करता येते. सणासुदीच्‍या हंगामादरम्‍यान तुम्‍ही दिवसभरात अनेक कार्यक्रम व कुटुंबिय किंवा मित्रांना भेटण्यामध्‍ये व्‍यस्‍त राहता, ज्‍यामुळे नियमितपणे फिटनेस वेळापत्रकाचे पालन करणे अवघड होऊन जाते. शारीरिक व्‍यायामासह पुन्‍हा उत्साहित होण्यासाठी चालणे, फूटबॉलसारखे सांघिक खेळ खेळणे, नृत्‍य (झुम्‍बा), सायकल चालवणे किंवा पोहणे असे व्‍यायाम करू शकता. याचे अनेक फायदे असू शकतात, जसे ऊर्जा पातळी वाढते, स्‍नायू बळकट होतात, फुफ्फुसाची क्षमता व रक्ताभिसरण वाढते, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तसेच तणाव दूर होतो व रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

५.हायड्रेटेड राहा

सामान्‍यत: हायड्रेटेड राहणे चांगल्‍या आरोग्‍यासाठी महत्त्वाचे असते. मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी डिहायड्रेशन टाळण्‍याकरिता अधिक प्रमाणात पाणी प्‍यावे, ज्‍यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण त्‍वरित कमी होते. या सूचना लक्षात ठेवण्‍यासोबत डॉक्टरांसोबतच्या उपायांबाबत सल्‍लामसलत केल्‍याने तुम्‍हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होऊ शकते. ज्‍यामुळे यंदा सुट्टीच्‍या हंगामामध्‍ये आरोग्‍यदायी व स्वस्थ जीवनाचा आनंद घेता येईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com