Diabetes Risk : सावधान ! लाईटमुळे वाढतोय मधुमेहाचा धोका; रिचर्समधून कारण आले समोर

मधुमेह का होतो? कसा होतो याची वेळोवेळी अनेक कारणे समोर आली आहेत.
Diabetes Risk
Diabetes RiskSaam Tv
Published On

Diabetes Risk : मधुमेह हा आजार भारतातील तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांनामध्ये सातत्याने दिसून येत आहे. मधुमेह का होतो? कसा होतो याची वेळोवेळी अनेक कारणे समोर आली आहेत.

लठ्ठपणा, खराब जीवनशैली आणि खाण्या-पिण्यातील निष्काळजीपणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो, हे आतापर्यंत सगळ्यांच माहित असेल. परंतु, जर असे सांगतिले की, आपल्या आजूबाजूच्या गोष्टीमुळे मधुमेही वाढतोय तर तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही. आपल्या घरातील आणि ऑफिसमधल्या दिव्यांमुळे देखील मधुमेहासारख्या धोकादायक आजाराचे कारण बनू शकतो. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासात मधुमेहाबाबत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या ऐकून धक्का बसेल.

Diabetes Risk
Diabetes Day : वयाच्या 40 वर्षापूर्वीही होऊ शकता 'या' गंभीर आजाराचे बळी , जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

संशोधनात धक्कादायक खुलासा

मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात संशोधकांनी दावा केला आहे की, जे लोक रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात असतात त्यांना मधुमेहाचा (Diabetes) धोका इतर लोकांपेक्षा 28% वाढतो. रात्रीच्या वेळी बाहेरील कृत्रिम प्रकाश (LAN) आणि मधुमेह यांच्यातील संबंध संशोधनातून समोर आला आहे. शांघायच्या जियातोंग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी मधुमेहाबाबत हे संशोधन केले आहे. सुमारे 98000 लोकांच्या डेटाचे विश्लेषण करून या अभ्यासाचा निकाल तयार करण्यात आला.

शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त धोका असतो

  • रस्त्यावरील दिवे, पार्किंगचे दिवे, वाहनांचे हेडलाईट, घर आणि कार्यालयांच्या बाहेर वापरले जाणारे दिवे यामुळे रात्रीच्या वेळी प्रदूषण वाढते.

  • कृत्रिम प्रकाशामुळे वातावरणातील अंधार कमी होतो व प्रदूषणाचा थर तयार होतो, असे संशोधनातून समोर आले आहे.

  • त्यामुळे आकाशातील तारे स्पष्ट दिसत नाहीत आणि नैसर्गिक पर्यावरण बिघडते.

  • खेड्यांपेक्षा शहरांमध्ये अधिक प्रकाश व प्रदूषण (Pollution) असल्यामुळे शहरी लोकांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

  • जगातील सुमारे 80% लोकसंख्या प्रकाश व प्रदूषणाच्या दुनियेत जगत आहे.

  • अमेरिका आणि युरोपमधील सुमारे 99% लोकसंख्या प्रकाश व प्रदूषणाला बळी पडत आहे, ज्यामुळे त्यांना अनेक रोग होत आहेत.

प्रकाश व प्रदूषणामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत

अनेक अभ्यासांमधून हे समोर आले आहे की, प्रकाश व प्रदूषणामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. रात्रीच्या वेळी पेटलेल्या दिव्यांमुळे मन:स्थिती आणि चिंताग्रस्त विकार, लठ्ठपणा, निद्रानाश या आजारांना मोठ्या संख्येने लोक बळी पडत आहेत. एवढेच नाही तर या दिव्यांमुळे कर्करोगाचा धोकाही वाढत आहे. एकंदरीत असे म्हणता येईल की रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात राहणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com