Diabetes Sign Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Sign : तुम्हाला देखील मधुमेहाची 'ही' लक्षणे दिसताय ? तर वेळीच व्हा सावध

मधुमेह हा आजच्या काळात अतिशय वाढत चाललेला आजार आहे.

कोमल दामुद्रे

Diabetes Sign : अनियमित जीवनशैलीमुळे बरेच लोक मधुमेह या आजाराला ग्रस्त आहेत. अशातच भरपूर लोक जास्त प्रमाणात धुम्रपान करतात. त्यामुळे हृदयविकार आणि अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू लागतात. अशातच मधुमेह हा आजच्या काळात अतिशय वाढत चाललेला आजार आहे. मधुमेह या आजाराला सामान्य आजार म्हणून ओळखला जातो.

बिगडलेली जीवनशैली आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, मधुमेह हा एक असा आजार आहे ज्याला नियंत्रित केले जाऊ शकते.

परंतु मुळापासून नष्ट केले जाऊ शकत नाही. मधुमेह या आजारामुळे तुम्हाला भविष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जर तुम्ही वेळीस मधुमेहावर नियंत्रण आणू शकले नाही तर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्याचबरोबर मधुमेह (Diabetes) ग्रस्त असलेल्यांना छातीत दुःखणे, हाय ब्लड प्रेशर, चक्कर येणे, घाम येणे अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवतात.

Diabetes Sign

मधुमेहाची लक्षणे (Symptoms)

  • मधुमेह या आजाराचा वाढता प्रभाव आपल्या वजनावर होतो. वाढते वजन हे मधुमेह रोग्यांचे लक्षण आहे.

  • त्याचबरोबर ब्लड शुगरचे (Sugar) प्रमाण देखील वाढते. या आजारापासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. या आजारापासून वाचण्यासाठी आहारामध्ये साखरेच प्रमाण खूप कमी केलं पाहिजे.

  • त्याचबरोबर रोज योगा आणि व्यायाम केला पाहिजे. नियमित व्यायामामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर व्यायाम केल्याने तुमच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

  • मधुमेह असणाऱ्या लक्षणांमध्ये जास्त प्रमाणात सतत तहान लागणे, हात आणि पायांमध्ये सूज येणे, अंधुक दिसणे, वारंवार शौचाला होणे, लवकर थकवा जाणवणे अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यावर तूम्ही त्वरित डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा आणि तुमचा डायबिटीज नियंत्रित ठेवावा.

  • त्याचबरोबर टाईप 2च्या डायबिटीजमध्ये वजन वाढणे, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, गर्भावस्थेत असताना रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढणे. अशी लक्षणे दिसून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणीटंचाईची झळ! स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटरसाठी लवकरच नियमावली

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT