डायबिटीजच्या रुग्णांमध्ये अनेक जीवनसत्वांची कमतरता असते.
व्हिटॅमिन D, B12, B1, B6 आणि C विशेषतः यांचे प्रमाण कमी असते.
औषधे, हाय ब्लड शुगर आणि अयोग्य आहारामुळे ही कमतरता वाढते.
योग्य पौष्टीक आहार आणि पूरक आहाराने यावर नियंत्रण ठेवता येते.
डायबिटीज हा आजार मुख्य:त गोड पदार्थांचे सेवन केल्याने होतो, असा समज आहे. मात्र हा समज खोटा आहे. तज्ज्ञांनी केलेल्या संधातून याविषयी आणखी लक्षणे आणि माहिती सांगण्यात आली आहे. यामध्ये डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये काही जीवनसत्वांची (Vitamin) कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते. यामागे अनेक कारणे आहेत.
काही औषधे जसे की, मेटफॉर्मिन ही शरीरात असणाऱ्या जीवनसत्वांचे शोषण कमी करतात. तर हाय ब्लड शुगर असल्यांच्या शरीरातून काही जीवनसत्वे लघवीवाटे बाहेर पडतात. याशिवाय तुमचा दैनंदिन आहार सुद्धा काही प्रमाणास कारणीभूत ठरतो. त्यामुळे टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये काही महत्त्वाच्या जीवनसत्वांची कमतरता दिसून येते. त्याबद्दल आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.
१) व्हिटॅमिन D
जास्त फॅट असणारे पदार्थ जसे की, मासे, अंडी, मशरूम आणि फोर्टिफाइड दुध आहे. तज्ज्ञांच्या अभ्यासात दिसून आले आहे की, सुमारे 74% टाईप 2 डायबिटीज रुग्णांमध्ये व्हिटॅमिन Dची पातळी कमी असते. त्यामुळे तुम्ही या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. याचा फायदा हाडं, स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी वाढवण्यासाठी होतो. शरीरातील कमतरतेमुळे हाडं कमकुवत होणे, स्नायूंमध्ये वेदना यासारखे त्रास होऊ शकतात.
२) व्हिटॅमिन B12
व्हिटॅमिन B12 हे मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते. त्यात तुम्ही मेटफॉर्मिन हे डायबिटीजचे औषध बराच काळ घेत असाल तर B12ची कमतरता तुमच्या शरीरात जाणवायला सुरुवात होते. यामुळे थकवा, कमजोरी आणि नसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
३) थायामिन (Vitamin B1)
ब्लड शुगरचे जास्त प्रमाण असल्याने डायबिटीज B1 सतत लघवीतून बाहेर पडते. यामुळे थकवा, स्नायूंची कमजोरी आणि नर्व्हस सिस्टीमशी संबंधित अडचणी होऊ शकतात.
४) व्हिटॅमिन B6
रक्तपेशी आणि मज्जातंतूसाठी शरीरात व्हिटॅमिन B6 असणे महत्त्वाचे आहे. संशोधनात दिसले की डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये B6 पातळी कमी असते. यामागे शरीरात सततची सूज (inflammation) आणि हाय ब्लड प्रेशर हे कारण असते.
५) व्हिटॅमिन C
ज्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, त्यामधून शरीराला व्हिटॅमिन C मिळते. जसे की संत्री, पालेभाज्या असे खाद्यपदार्थ यामध्ये येतात. टाईप 2 डायबिटीज असलेल्या रुग्णांपैकी 55% लोकांमध्ये व्हिटॅमिन C कमी असल्याचे दिसून आले. हे antioxidant असल्याने शरीरातील oxidative stress कमी करण्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.