AI in Healthcare saam tv
लाईफस्टाईल

AI in Healthcare : केवळ आवाज ऐकून समजणार डायबेटीज झालाय की नाही; AI चा नवा चमत्कार करेल हैराण

AI Detects Diabetes Through Voice: लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांनी एका नवीन शोधात असं उघड झालं की, मधुमेहाने ग्रस्त लोकांच्या आवाजात एक विशेष बदल होतो, ज्याला 'व्हॉइस सिग्नेचर' म्हटलं जातं.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की, अनेक आश्चर्यचकित गोष्टी आता मानव साध्य करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानात आणखी एक मोठी क्रांती झाली आहे. आता फक्त २५ सेकंदांच्या व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे एखाद्या व्यक्तीला टाइप २ मधुमेह आहे की नाही हे ठरवता येणं शक्य असणार आहे. लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांनी एका नवीन शोधात असं उघड झालं की, मधुमेहाने ग्रस्त लोकांच्या आवाजात एक विशेष बदल होतो, ज्याला 'व्हॉइस सिग्नेचर' म्हटलं जातं.

संशोधकांनी एक विशेष एआय अल्गोरिथम विकसित केलं असून तो आवाजातील सूक्ष्म बदल ओळखू शकतो. टाइप २ डायबेटीजमध्ये फुफ्फुसं, स्नायू आणि शरीरातील नसा प्रभावित होतात. ज्यामुळे आवाजात किंचित कर्कशपणा किंवा ताण येऊ शकतो, असं म्हटलं गेलंय. या अल्गोरिथमची चाचणी ६०७ लोकांच्या व्हॉइस रेकॉर्डिंगवर करण्यात आली. या लोकांना ३० सेकंदांसाठी एक विशेष मेसेज वाचण्यास सांगण्यात आला होता.

AI ने किती अचूक दिले रिझल्ट?

संशोधनाच्या निकालांनुसार, हे AI अल्गोरिथम ७१% पुरुष आणि ६६% महिलांमध्ये टाइप-२ मधुमेह योग्यरित्या ओळखण्यात सक्षम होतं. हे संशोधन नुकतेच PLOS डिजिटल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात लोकं या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या घरात बसून डायबेटीजचं निदान करू शकतील आणि वेळेत उपचार सुरू करू शकतील.

आवाजामुळे ओळख कशी बदलते?

लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमधील प्रिसिजन हेल्थचे संचालक डॉ. गाय फेग्राझी यांनी सांगितलं की, टाइप २ मधुमेह फुफ्फुसांच्या कार्यावर परिणाम करतो. जेव्हा आपण बोलतो तेव्हा हवा व्हॉइस बॉक्समधून जाते आणि त्यांच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. या प्रक्रियेत, मान आणि घशाचे लहान स्नायू काम करतात, जे मधुमेहामुळे प्रभावित होऊ शकतात. म्हणूनच मधुमेह असलेल्या लोकांना अनेकदा आवाजात थोडासा कर्कशपणा, ताण आणि स्वरांमध्ये बदल जाणवतो.

इतर आजारांचीही होऊ शकते माहिती

ही पद्धत केवळ मधुमेहापुरती मर्यादित असून शास्त्रज्ञ आता मानसिक आरोग्य आणि पार्किन्सन सारख्या आजारांची ओळख पटवण्यासाठी एआयचा वापर करतायत. संशोधनानुसार, डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या आवाजात कमी ऊर्जा, मंद गती आणि एकरसता असते. त्यावेळी, पार्किन्सनची सुरुवातीची लक्षणं ओळखण्यात AI अगदी अचूक असल्याचं सिद्ध झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT