Free cancer vaccine: राज्यातील 0-14 वयोगटातील मुलींना कॅन्सरविरोधी फ्री लस; कधी मिळणार लस, पाहा!

Maharashtra govt to provide free cancer vaccine: मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे. 14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
Free cancer vaccine
Free cancer vaccinesaam tv
Published On

नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार, देशात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. अशातच आता कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे. 14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती आहे.

ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांत उपलब्ध होईल. देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतायत. त्यासाठी सरकारने हे मोठं पाऊल उचललंय. दरम्यान यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

Free cancer vaccine
Diabetes: मधुमेहाच्या रूग्णांना हृदयाच्या समस्यांचा धोका दुप्पट; कशी काळजी घ्यावी, तज्ज्ञांनी दिली माहिती

प्रकाश आबिटकरांनी काय दिली माहिती?

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "जीवनशैली बदलल्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा आता कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. पूर्वी व्यसन असल्यावर कॅन्सर व्हायचा. पण, आता लहान मुलांनाही कर्करोग होताना दिसतंय. ही खूपच चिंतेची बाब आहे."

Free cancer vaccine
Uterus removal surgery: गर्भाशय काढून टाकल्यानंतर मासिक पाळी येते का? याचा मासिक पाळीवर कसा होतो परिणाम?

राज्यातील ० ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्हीची लस मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती आबिटकर यांनी दिली.

देशात वाढतंय कॅन्सरचं प्रमाण

येत्या काही वर्षांत जगभरात स्तनाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढणार असल्याचं WHO ची कॅन्सर संस्था आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) यांनी म्हटलं आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या अभ्यासातून जगात दर मिनिटाला एका महिलेचा ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे.

Free cancer vaccine
Cancer Deaths : धक्कादायक! दर मिनिटाला एका महिलेचा 'या' कॅन्सरने मृत्यू; WHO च्या रिपोर्टमधून मोठा दावा

२०५० पर्यंत जगभरात स्तनाच्या कॅन्सरचं निदान आणि मृत्यू वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेची कॅन्सर एजन्सी आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी व्यक्त केली आहे. तर २०५० पर्यंत जगभरात दरवर्षी ३२ लाख नवीन रुग्ण आणि १.१ दशलक्ष मृत्यू होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com