Diabetes Control Tips
Diabetes Control Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Control Tips : दिसायला इवलेसे पण मधुमेहावर बहुगुणी ठरेल जांभूळ !

कोमल दामुद्रे

Benefits of Jamun : उन्हाळा म्हटलं की, आपल्या रानमेवा सहज चाखायला मिळतो. पण बरेचदा रानमेवा वाटतं असणारे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

मधुमेह (Diabetes) हा आजार (Disease) हा बहुतांश लहान मुलांपासून ते वयोवृद्धांमुळे आढळून येत आहे. परंतु, जांभूळ आणि त्याचे दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. दिसायला छोटे पण आरोग्यासाठी बहुगुणी आहे. याचे नियमित सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर (Benefits) आहे.

जांभूळ रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रित ठेवण्यास तसेच त्वचेची चमक वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. आजकाल मधुमेहाची समस्या खूप सामान्य झाली आहे. लहान वयातच लोकांना या आजाराने घेरले आहे. मधुमेहाला सायलेंट किलर म्हणतात आणि हळूहळू हा आजार शरीराच्या इतर भागांनाही इजा करतो.

मधुमेहाच्या बाबतीत तो आटोक्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी काही नैसर्गिक पद्धतींचाही अवलंब करता येईल. जांभूळाच्या दाण्यांची पूड देखील मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरते. जांभूळ हे आयुर्वेदाचे फळ आहे आणि फळासोबतच त्याचे दाणेही खूप प्रभावी आहेत. जाणून घेऊया त्याचे फायदे

जांभळाचे फायदे

1. रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रणात-

जांभळाचे फळ, पाने आणि त्याचे दाणे हे तिन्ही मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. विशेषत: जांभळाच्या दाण्यापासून बनवलेली पावडर खूप फायदेशीर आहे. जांभूळमध्ये अल्कलॉइड असते जे स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होण्यास प्रतिबंध करते. साखरेच्या रुग्णांसाठी जांभूळ खूप फायदेशीर आहे.

2. पचनशक्ती सुधारते -

जांभळात असलेले घटक पचन सुधारण्यास खूप मदत करतात. त्याची पावडर आतड्याची हालचाल सुधारण्यास देखील मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांना आतड्याची हालचाल चांगली असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत पचनक्रिया उत्तम होण्यासाठी जांभूळ फळ किंवा त्याची पावडर खाऊ शकतो.

3. डिटॉक्सिफिकेशन -

शरीर डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी जांभूळ देखील प्रभावी ठरू शकते. जांभळ्याचा पावडरमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. यासोबतच ते रोगप्रतिकारक शक्ती चांगले काम करण्यासही उपयुक्त आहे.

4. त्वचा -

जांभळाचा पावडर देखील त्वचेसाठी (Skin) खूप फायदेशीर मानली जाते. याची चव तुरट असते आणि त्याची पाने त्वचेसाठीही फायदेशीर असतात. जांभूळ चूर्णाचा वापर केल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन पुन्हा चमक येऊ शकते.

5. रक्तदाब -

जांभळाच्या दाण्यांमध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची क्षमता देखील असते. अनेक संशोधनांमध्येही याचे सेवन रक्तदाबासाठी फायदेशीर मानले गेले आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT