Diabetes And High Blood Pressure Guidelines : मधुमेह व उच्च रक्तदाबापासून लांब राहायचे आहे ? Who च्या 'या' नियमांना नेहमी ठेवा लक्षात !

WHO Guidelines For Healthy Life : मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी काही आरोग्यविषयक सूचना जारी केल्या जात आहेत.
Diabetes And High Blood Pressure Guidelines
Diabetes And High Blood Pressure GuidelinesSaam Tv
Published On

Health Care Tips By WHO : मधुमेह व उच्च रक्तदाबाची समस्या ही हल्ली प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. या आजाराचे बळी हल्ली प्रत्येक तरुण पिढी पडत आहे. अशातच तरुणांना झपाट्याने घेरणाऱ्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी काही आरोग्यविषयक सूचना जारी केल्या जात आहेत.

यासोबतच अनेक वैद्यकीय संशोधनेही प्रसिद्ध होत आहेत. कोविड नंतर ज्या आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत त्यामध्ये उच्च रक्तदाब (Blood Pressure) आणि मधुमेह (Diabetes) टाइप -2 ची देखील बरीच प्रकरणे आहेत.

Diabetes And High Blood Pressure Guidelines
Cookies Recipe For Diabetic Patient : मधुमेहींनो, सतत गोड खाण्याची इच्छा होतेय? मग नाचणीचे कुकीज नक्की ट्राय करा

जास्त साखर (Sugar) आणि जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेह टाईप-2 हा प्रामुख्याने होतो. यासोबतच तेल (Oil) किंवा चरबीचे प्रमाणही जास्त असेल तर हे पदार्थ आपल्याला लवकर आजारी (Disease) आणि अशक्त बनवतात.

हे लक्षात घेऊन, जीवनशैलीमुळे लोक या आजारांना बळी पडू नयेत म्हणून WHO ने निरोगी आहाराबाबत काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना याबाबत सतर्क केले होते, त्यानंतर अनेक देशांनी त्यांच्या बाजारात मिळणाऱ्या जंक फूडवर बंदी घातली होती. जाणून घेऊया आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी

Diabetes And High Blood Pressure Guidelines
Brinjal And Diabetes : मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी वांग आहे रामबाण, अशा पद्धतीने खाल्ल्यास होईल फायदा !

1. एका दिवसात किती मीठ खावे?

Who च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निरोगी व्यक्तीने एका दिवसात 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. यापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हाडे कमकुवत होण्याची समस्या वाढू शकते.

2. एका दिवसात किती साखर खावी?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निरोगी व्यक्तीने दिवसातून 6 ते 8 चमचे साखरेचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला साखरेची समस्या किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही शुद्ध साखर वापरणे पूर्णपणे टाळावे. त्याऐवजी फळे आणि सुका मेवा खा. जेणेकरून तुमची गोड लालसा शांत होईल आणि तुम्हाला नैसर्गिक साखरेची ऊर्जा मिळेल.

Diabetes And High Blood Pressure Guidelines
Potato Consumption Causes Diabetes : बटाट्याच्या सेवनाने मधुमेह होतो ? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

3. एका दिवसात किती तेल खावे?

ज्या व्यक्तीला कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब किंवा साखरेची समस्या किंवा कोणताही दीर्घ, गंभीर आणि जुनाट आजार नाही, त्या व्यक्तीने दिवसातून जास्तीत जास्त 4 चमचे तेल वापरावे. हेच प्रमाण वितळलेल्या देशी तुपासाठी देखील लागू आहे. मात्र, देशी तूप गायीचे असेल तर त्याचे प्रमाण एक-दोन चमच्याने वाढवता येते. दैनंदिन जीवनात या निश्चित प्रमाणापेक्षा जास्त चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते आणि हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोकाही वाढतो.

त्यामुळे डायबिटीज टाईप-२, हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपीची समस्या टाळायची असेल तर रोजच्या आहारात तेल, साखर आणि मीठ यांचा योग्य प्रमाणात वापर करा. त्यांचे अतिसेवन तुम्हाला आजारी बनवू शकते आणि त्यांचे कमी सेवन केल्याने तुमचे शरीर कमजोर होऊ शकते. कारण शरीरात साखरेची किंवा मीठाची कमतरता असेल तर बीपी कमी होतो, हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com