Potato Consumption Causes Diabetes : बटाट्याच्या सेवनाने मधुमेह होतो ? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

Diabetes Tips : लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण बटाट्यापासून बनलेल्या पदार्थांना अगदी चवीने खातात
Potato Consumption Causes Diabetes
Potato Consumption Causes DiabetesCanva
Published On

Side Effects Of Potatoes : प्रत्येकाच्या घरामध्ये बटाट्याचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. प्रत्येक भाजीमध्ये बटाटा घालतात. त्याचबरोबर बटाट्याची भाजी असो किंवा बटाट्यापासून बनणारी कोणतीही चविष्ट डिश असो, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण बटाट्यापासून बनलेल्या पदार्थांना अगदी चवीने खातात.

चविष्ट असल्यामुळे लहान मुलांना बटाट्यापासून बनणारे पदार्थ खाण्यास अतिशय आवडतात. बटाट्याच्या वेफरपासून फ्रेंच फ्राईजपर्यंत लहान मुलांसोबत तरुण मंडळी देखील या पदार्थांचे सेवन करतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की बटाट्याच्या (Potatoes) जास्त सेवनाने तुम्ही आजारी (Disease) पडू शकता.

Potato Consumption Causes Diabetes
Diabetes Health Issue : 'या' 4 सवयी ठरतात तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत !

जास्त प्रमाणात फ्राईड बटाटा खाल्ल्याने वजन वाढणे त्याचबरोबर मधुमेह होणे सारख्या समस्या वाढतात. यासोबत अनेक आजार तुम्हाला जडू शकतात.

योग्य प्रमाणामध्ये बटाटा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु चविष्ट असल्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त बटाटा खाल्ल्याचे नुकसान देखील आहेत. इंदोर संभागचे पूर्व रीजनल डायरेक्टर एवं सीएमएचओ डॉक्टर शांतीलाल पोरवाल यांच्या म्हणण्यानुसार बटाट्यामध्ये जास्त प्रमाणात स्टार्च उपलब्ध असते. पुढे जाऊन जास्त प्रमाणात बटाटा खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेह झाल्याने याचा प्रभाव किडनीवर देखील पडतो आणि अनेक समस्या निर्माण होतात.

Potato Consumption Causes Diabetes
Diabetes Tips : ब्लड शुगरला आटोक्यात आणण्यासाठी सेवन करा 'या' 5 पानांचे, मधुमेहांसाठी तर बहुगुणी !

जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन केल्याने मोठे नुकसान ?

1. लठ्ठपणा :

बटाट्याची चव प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आवडते. बटाट्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड तयार केले जातात. पोटॅटो चिप्स पासून फ्रेंचफ्राईज पर्यंत हे सगळे पदार्थ तरुण मंडळी आणि इतर सगळ्यांना फार आवडतात. परंतु बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो. त्याचबरोबर बटाट्याच्या सेवनाने शरीरामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट वाढतात. ज्यामुळे चरबी वाढू लागते.

2. मधुमेह (Diabetes) :

बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. बटाट्यांमध्ये भरपूर प्रमाणात सिम्पल कार्बोहायड्रेट असून सोबतच स्टार्च देखील उपलब्ध असतो. जो मधुमेहाचा धोका वाढवतो. ज्या व्यक्तींना मधुमेह असेल त्यांनी बटाट्याचे सेवन नाही केले गेले पाहिजे. जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन केल्याने यांच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढू शकते.

Potato Consumption Causes Diabetes
Diabetes Control Tips : लग्नसराईत मधुमेहींच्या रुग्णांनी अशाप्रकारे करा सेट करा डाएट प्लान, सतत वाढणार नाही तुमची शुगर

3. पोटॅशियम :

बटाट्यामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम उपलब्ध असते. त्या व्यक्तींची किडनी डॅमेज आहे. किंवा त्यांची किडनी इनफंक्शनिंग आहे, म्हणजेच ज्यांची किडनी रक्तामध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियममधील जास्त प्रमाणाला फिल्टर करू शकत नाही. ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com