Diabetes Tips: उन्हाळ्यात मधुमेहांसाठी फायदेशीर आहे आंब्याची पाने; वाढलेली शुगर येते मिनिटांत खाली, फक्त याप्रकारे करा सेवन

Mango Leaves Benefits For Diabetes Patient: रक्तातील साखरेवर बराच काळ नियंत्रण न राहिल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.
Diabetes Tips - Mango Leaves
Diabetes Tips - Mango LeavesSaam Tv
Published On

Control Sugar Level: भारतातील असंख्य लोक हे मधुमेहांच्या आजाराने ग्रस्त आहेत. यामध्ये शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. रक्तातील साखरेवर बराच काळ नियंत्रण न राहिल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णामध्ये रक्तातील साखर (Sugar) नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. मधुमेहाच्या रुग्णांनी अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा, ज्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर सहज नियंत्रित करता येते.

Diabetes Tips - Mango Leaves
Diabetes And High Blood Pressure Guidelines : मधुमेह व उच्च रक्तदाबापासून लांब राहायचे आहे ? Who च्या 'या' नियमांना नेहमी ठेवा लक्षात !

उन्हाळ्यात मिळणारे आंब्याचे पान मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय गुणकारी ठरते. आंबा (Mango) ज्याला फळांचा राजा म्हणतात. आंब्याच्या अतिसेवनाने साखर वाढू शकते, पण आंब्याचे पान हे साखरेच्या रुग्णांसाठी उत्तम उपाय आहे. याच्या सेवनाने रक्तातील साखर सहज नियंत्रित करता येते.

हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, आंब्याच्या पानामध्ये पोषक तत्वांचा समावेश असतो, ज्याचा उपयोग कर्करोगासारख्या (Cancer) आजारांवर (Disease) उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही आंब्याचे पान गुणकारी आहे. याच्या सेवनाने मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येते. आंब्याचे पान रक्तातील साखर कशी नियंत्रित करते ते जाणून घेऊया.

Diabetes Tips - Mango Leaves
Cookies Recipe For Diabetic Patient : मधुमेहींनो, सतत गोड खाण्याची इच्छा होतेय? मग नाचणीचे कुकीज नक्की ट्राय करा

1. आंब्याचे पान रक्तातील साखर कसे नियंत्रित करते:

आंब्याच्या पानांमध्ये मँगीफेरिन मीठाचा अर्क आढळतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. पोषक तत्वांनी युक्त असलेली आंब्याची पाने अनेक रोगांपासून संरक्षण करतात आणि शरीर निरोगी ठेवतात. मधुमेही रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, अशा परिस्थितीत आंब्याच्या पानांचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आजारी पडण्याची शक्यताही कमी होते.

2. मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याच्या पानांचे सेवन कसे करावे ?

आंब्याचे पान मधुमेहावर रामबाण उपाय म्हणून काम करते. मधुमेहाच्या रुग्णांनी 10 ते 15 आंब्याची पाने पाण्यात उकळून हे पाणी रात्रभर झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी या पानांचे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या यामुळे रक्तातील साखर दिवसभर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com