डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी एक साधी सवय सुद्धा रक्तातल्या साखरेची पातळी वाढवते. असा इशारा डॉक्टरांकडून दिला गेला आहे. अमेरिकेतील CDC च्या अहवालानुसार सध्या दर दोनपैकी एक डायबिटीज रुग्ण किंवा प्री-डायबेटीसने ग्रस्त आहे. अशातच सणावांरांना गोड खाण्याचं प्रमाण जास्तच वाढत चाललं आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, फक्त लठ्ठपणा हीच समस्या नसून रोजची हालचाल कमी होणं आणि शरीराला पुरेसं पाणी न मिळणं हेही रक्तातील साखर वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे.
आहारतज्ज्ञ सांगतात की, पाणी हे डायबिटीजवरील औषधांचा पर्याय नाही, मात्र शरीरात पाण्याची कमी असल्याने रक्तातली साखर जास्त दाट होते आणि ती बाहेर टाकणं कठीण होतं. रक्तातला प्लाझ्मा सुमारे 92 टक्के पाण्याने बनलेला असतो. त्यामुळे डीहायड्रेशनही रक्तातील साखरेत लक्षणीय वाढ करू शकतं. डीहायड्रेटेड रक्त हे सिरपसारखं घट्ट होतं, कारण त्यातील पाणी कमी झालेलं असतं आणि साखरेचं प्रमाण तुलनेने जास्त असतं.
डायबिटीज रुग्णांमध्ये 50 ते 110 mg/dL पर्यंतची साखर पातळीही धोक्याची मानली जाते आणि डीहायड्रेशनमुळे ही पातळी सहज वाढते. सामान्य आणि डायबिटीजच्या पातळीतली फरक कधी कधी फक्त 25 mg/dL इतकाच असतो, त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे होणारी वाढ गंभीर ठरू शकते.
मात्र तज्ज्ञ स्पष्ट करतात की, फक्त पाणी पिण्याने उच्च रक्तशर्करा बरी होत नाही किंवा इन्सुलिन व औषधांची गरज संपत नाही. जेवणानंतर होणारी साखरेची अचानक वाढ पाणी लगेच कमी करू शकत नाही. तरीही पुरेसे पाणी पिल्यास मूत्रपिंडांमार्फत जास्त ग्लुकोज शरीराबाहेर टाकण्यास मदत होते आणि हार्मोन्सवरही सकारात्मक परिणाम होतो.
संशोधनानुसार, डीहायड्रेशनमुळे काही वेळा ब्लड शुगर रीडिंग प्रत्यक्षात असण्यापेक्षा जास्त दिसू शकतं. जेवणापूर्वी पाणी प्याययाने टाइप-2 डायबिटीज रुग्णांमध्ये फास्टिंग शुगर कमी झाल्याचं आढळलं आहे. डॉक्टरांच्या मते, अनावश्यकपणे जास्त रीडिंग आल्यास आधी पाणी पिऊन पुन्हा तपासणी करणं सुरक्षित ठरू शकतं, कारण चुकीच्या रीडिंगमुळे उपचारात चूक होण्याचा धोका असतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.