Diabetes: डायबिटीज असलेल्या रुग्णांना किडनी खराब होण्याचा धोका, 'ही' १ चूक ठरते कारण

Kidney: डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. रक्तातील साखर, चुकीचा आहार आणि औषधांचा गैरवापर यामुळे गंभीर किडनी आजार उद्भवू शकतो.
diabetes kidney disease
diabetes kidney diseasegoogle
Published On

डायबिटीज असलेल्या रुग्णांना किडनीच्या आजाराला सामोरे जावे लागते. तज्ज्ञ म्हणतात, अनेक रुग्णांमध्ये किडनीचा आजाराचे कारण वाढती डायबिटीज आहे. संशोधनातून केलेल्या आकडेवारीनुसार एकतृतीयांशाहून जास्त लोकांना आयुष्यात कधीतरी किडनीशी संबंधित त्रास होतोच. याचं एक जग जाहीर कारण म्हणजे रक्तातील वाढलेलं साखरेचं प्रमाण आहे.

याशिवाय संसर्ग, ऑटोइम्युन आजार किंवा घातक खूप घातक औषधांच्या परिणामामुळे डायबिटीज किडनी डिसीजचा धोका वाढतो. याच धोका टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता.

diabetes kidney disease
BP हाय होण्याचं कारण काय? तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् चुकीच्या सवयींमुळे होणार परिणाम

वाढत्या वयानुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात आणि याचा थेट परिणाम किडनीवर होतो. म्हणून यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. तसेच आहारात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण नियंत्रित ठेवून भाज्या आणि कमी फॅटी प्रथिनांचा समावेश करणं गरजेचं आहे.

यासाठी सुरुवातीला साखरेचे कोणतेच पदार्थ खाऊ नका. मीठ टाळा, खूप चाला, सायकलिंग करा, योगा किंवा हलका व्यायाम करा. फक्त 5 टक्के वजन कमी झालं तरी इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तदाबही कमी होऊ शकतो.

पुरेशी पाणी पिण्याची सवयही मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. मधुमेही रुग्णांना मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. असे संसर्ग वेळेत ओळखून उपचार न केल्यास ते मूत्रपिंडापर्यंत पोहोचून गंभीर नुकसान करू शकतात. विशेषतः ज्यांना किडनी स्टोन, युरेथ्रल अडथळे किंवा इतर जोखमीचे घटक आहेत, त्यांनी जास्त सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. वेदनाशामक औषधं, काही अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं किडनीसाठी घातक ठरू शकतं.

diabetes kidney disease
Cooking Tips: सुक्या भाजीत मीठ जास्त पडलं? घाबरू नका; या 6 सोप्या ट्रिक्सने खारटपणा होईल कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com