Sakshi Sunil Jadhav
स्वयंपाक करताना थोडी चूक झाली, विशेषतः सुक्या भाजीत मीठ जास्त पडलं, तर संपूर्ण भाजी वाया जाण्याची भीती वाटते. मात्र काही सोप्या किचन हॅक्स वापरून तुम्ही सुक्या भाजीचा खारटपणा सहज कमी करू शकता.
भाजीमध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घातल्याने जास्त मीठ शोषलं जातं आणि चव बॅलेन्स होते.
बटाटा, दोडका, फरसबी, गाजर अशा वाफवलेल्या भाज्या सुक्या भाजीमध्ये मिक्स केल्याने खारटपणा कमी होतो.
घरात कच्च्या भाज्या नसतील तर थोड्या तेलात भाज्या स्टीर फ्राय करून भाजीमध्ये मिक्स करा.
अगदी थोडासा लिंबाचा रस किंवा आमसूल घातल्यास खारट चव कमी होऊ शकतो.
खूपच खारट असेल तर चिमूटभर साखर किंवा किसलेला गूळ घालू शकता, पण प्रमाण जपून.
कोरड्या भाज्यांमध्ये ताजा किंवा भाजलेला नारळाचा किस घातल्यास चव मवाळ होते.
काही भाज्यांमध्ये थोडीशी दही किंवा ताक घालून पुन्हा परतल्यास खारटपणा कमी होतो. खूपच खारट असेल तर त्या भाजीचा वापर पोळी, पराठा, सँडविच किंवा कटलेटच्या सारणासाठी करा.