Dhanteras 2023 Saam TV
लाईफस्टाईल

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला सोनं खरेदीसाठी मुहूर्त कधी? जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त

Dhantrayodashi Puja Vidhi :धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.

कोमल दामुद्रे

Dhantrayodashi Date 2023 :

दिवाळी सणातील दुसरा आणि महत्त्वाचा सण धनत्रयोदशी. आश्विन महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा हा सण १० नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.

असे म्हटले जाते की, समुद्रमंथनातून देवांचे वैद्य धन्वतंरी प्रकट झाले होते. आरोग्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. हा दिवस कुबेराचाही दिवस मानला जातो. या दिवशी समृद्धीसाठी कुबेर देवाची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. धनत्रयोदशी या गोष्टी खरेदी करणे शुभ

धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी धातूपासून बनवलेले कोणतेही पाण्याचे भांडे खरेदी करु शकता. या दिवशी गणेश आणि लक्ष्मीच्या विविध मूर्ती खरेदी केल्या जातात. खेळणी आणि मातीचे भांडे देखील खरेदी केले जाते. या दिवशी सोन्या (Gold)-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते.

2. धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त

  • धनत्रयोदशीला १० नोव्हेंबरला अभिजित मुहूर्त (Muhurt) सकाळी ११.४३ मिनिटे ते १२.२६ मिनिटांपर्यंत आहे.

  • सकाळी ११.५९ ते दुपारी ०१.२२ पर्यंत शुभ चौघडिया असल्यामुळे हा काळ देखील चांगला आहे.

  • दुपारी ०४.०७ मिनिटे ते ०५.०३ पर्यंत चार चौघडिया असल्यामुळे खरेदीसाठी उत्तम मुहूर्त आहे.

3. धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ वेळ

प्रदोष काळ - संध्याकाळी ०५.३० ते ०८.०८ पर्यंत सुरु होईल.

वृषभ काळ - ०५.४७ ते ०७.४७ पर्यंत असेल.

4. धनत्रयोदशी पूजा विधी

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी उत्तरेकडे कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करा. दोघांच्या समोर तुपाचा एकमुखी दिवा लावा. मिठाई अर्पण करा. "ओम ह्रीं कुबेराय नमः" चा जप करा. दिवाळीच्या दिवशी धनस्थानावर कुबेर ठेवा आणि पूजेच्या ठिकाणी धन्वंतरीची प्रतिष्ठपना करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT