Dengue Fever Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Dengue Prevention: पावसाळ्यात डेंग्यूच्या साथीचा धोका, ही लक्षणं दिसली तर अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dengue Fever: देशात सध्या खूप पाऊस पडत आहे. दिल्लीत आलेल्या पुरामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. एकीकडे पुराने माजलेला हाहाकार तर दुसरीकडे पावसाने होणारे आजार यामुळे नागरीक हैरान आहेत.सध्या डेंग्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे. डेंग्यू हा एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे पसरतो. डेंग्यूचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे शास्त्रीय डेंग्यू ताप, ज्याला 'ब्रेक द बोन' ताप देखील म्हणतात, आणि दुसरा डेंग्यू हेमोरेजिक ताप (DHF) हा जीवघेणा आहे. डेंग्यूची लागण झालेली मादी डास (Mosquito) दिवसा (पहाटेपासून संध्याकाळपर्यंत) घरातील आणि घराबाहेरील लोकांना चावू शकते. डेंग्यूची लक्षणे कोणती आहेत आणि त्यावर उपाययोजना ही माहिती पुढीलप्रमाणे -

डेंग्यू झाल्याची लक्षण मच्छर चावल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी लक्षात येतात. ही आहेत लक्षण

  • अचानक ताप येणे

  • पाठ दुखणे

  • डोळे, स्नायू,सांधे आणि हाडांमध्ये दुखणे

  • डोकेदुखी

  • पोटात अस्वस्थता होणे

  • त्वचेवर लाल पुरळ येणे

  • डेंग्यू झाल्यावर घ्यायची काळजी (Care)

  • पाणी आणि द्रव्यपदार्थांचे सेवन वाढवणे

  • हलका आहार करणे

  • आराम करणे

डेंग्यू झाल्यावर हे उपाय करा

डेंग्यू झाल्यावर सर्वात आधी डॉक्टरकडून सल्ला घ्यावा. ताप असेल तर पॅरासिटेमॉल,तर उल्टीसाठी अॅंटीइमेटीक घ्यायचा सल्ला दिला जातो.उपचारांसोबत द्रव्य पदार्थांचे सेवन करावे. डेंग्यूसाठी कोणत्याही प्रकारचे अॅंटीव्हायरल उपचार उपलब्ध नाही आहेत.डेंग्यूसाठी कोणतीही अॅंटीबायोटीक गोळ्यांचे सेवन करु नये.

डेंग्यू बरा होण्यासाठीचा कालावधी

डेंग्यू बरा होण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी असतो. त्यामध्ये चौथा आणि पाचवा दिवस खूप महत्त्वाचा असतो.यादरम्यान पेशी कमी होण्याची शक्यता असतो. या दिवसात जास्त काळजी घ्यावी लागते. या काळात त्वचेवर (Skin) पुरळ उठू नये याची काळजी घ्यावी. जर तुम्हाला तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पुरळ उठली याचा अर्थ तुम्ही तुमच्या प्लेटलेटची संख्या तपासली पाहिजे.

डेंग्यूपासून वाचण्यासाठी हे उपाय

  • डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही मूलभूत खबरदारीचे पालन केले पाहिजे.

  • घराभोवती आणि पाण्याच्या टाक्या स्वच्छ करा.

  • घराच्या दारावर आणि खिडक्यांना पडदे लावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT