Beauty Skin Tips Saam TV
लाईफस्टाईल

Beauty Skin Tips : काळ्या अंडरआर्म्समुळे चार माणसांत हात वर करण्याची लाज वाटतेय? मग 'या' टिप्सने झटपट गायब होईल डार्कनेस

Dark Underarms : स्लिवलेस ड्रेस परिधान केल्यावर ट्रेनने प्रवास करताना वरती हँडल धरावे लागते. तसेच ऑफिसमध्ये किंवा बाहेर अन्य कोणत्याही कामात, तसेच आळस देताना आपण हात वर करतो.

Ruchika Jadhav

अनेक मुलींना सुंदर स्लिवलेस ड्रेस परिधान करावासा वाटतो. त्यासाठी पार्ललरमध्ये सर्वचजणी अंडरआर्म्स करतात. मात्र वॅक्स करत असताना काहीवेळा चुकीच्या पद्धतीने स्किन खेचली जाते. किंवा चुकीचे प्रोडक्ट वापरले जाते. त्यामुळे स्किनवर काळा थर जमा होतो. यामुळे अंडरआर्म्स केले असले तरी काखेत काळे डाग तयार होतात.

असे झाल्याने आपल्याला देखील चार माणसांमध्ये हात वर करण्याची लाज वाटते. मुलींपेक्षा महिला वर्गात ही समस्या जास्तप्रमाणात जाणवते. स्लिवलेस ड्रेस परिधान केल्यावर ट्रेनने प्रवास करताना वरती हँडल धरावे लागते. तसेच ऑफिसमध्ये किंवा बाहेर अन्य कोणत्याही कामात, तसेच आळस देताना आपण हात वर करतो. मात्र अशा स्थितीत महिलांच्या मनात लज्जा निर्माण होते. त्या मोकळ्यामनाने हात वर करू शकत नाहीत.

महिलांची ही अडचण लक्षात घेत आम्ही काही सुंदर आणि सिंपल ट्रिक्स शोधल्या आहेत. याचा वापर केल्याने तुम्हाला कोणताही साइडइफेक्ट होणार नाही. त्यासह अंडरआर्म्स काळे झाले असल्यास ते एक ते दोन वेळेनंतर सुंदर गोरे होऊ लागतील. त्यावरील डार्कनेस कमी झालेला दिसेल.

बेकिंग सोडा स्क्रब

एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये एक चमचा पाणी मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या अंडरआर्म्सवर तुम्ही अप्लाय करा. किमान १५ ते २० मिनिटे तसंच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने स्किन धुवून घ्या. दुसऱ्या वापरानंतर लगेचच तुम्हाला याचा रिजल्ट मिळेल.

जास्त डार्क अंडरआर्म्ससाठी

तुमचे अंडरआर्म्स जास्तच डार्क असतील तर एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा पीठ आणि एक चमचा दही घ्या. दे एका वाटीत मिक्स करून घ्या. ही पेस्ट तुमच्या अंडरआर्म्सवर अप्लाय करा. २० मिनिटे हे मिश्रण असंच ठेवा. त्यानंतर अंडरआर्म्स स्वच्छ धुवून घ्या. याने देखील बराच परिणाम होतो.

१० मिनिटांत डाग गायब

नारळाचं तेल प्रत्येक व्यक्तीच्या घरी असतं. त्यामुळे या तेलाचा वापर करून तुम्ही देखील डार्क अंडरआर्म्स गोरे करू शकता. त्यासाठी बेकिंग सोडामध्ये तेल मिक्स करा. ही पेस्ट तुम्ही अंडरआर्म्सवर लावून घ्या. त्यानंतर अवड्या १० मिनिटांत डाग गायब झालेले दिसतील.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

SCROLL FOR NEXT