Dark Neck Skin saam tv
लाईफस्टाईल

Dark Neck Skin: मानेभोवती काळपटपणा साचलाय? दुर्लक्ष नको, ‘या’ गंभीर आजारांचं असू शकतं सुरुवातीचं लक्षण

Insulin Resistance: मानेभोवती दिसणारा काळपटपणा केवळ घाण किंवा टॅनिंग नसून मधुमेह, लठ्ठपणा किंवा हार्मोनल समस्यांचं लक्षण असू शकतं. अकॅन्थोसिस नायग्रिकन्सबाबत डॉक्टरांनी महत्त्वाचा इशारा दिला असून जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मानेभोवती काळपटपणा किंवा काळ्या रंगाचा सर्कल दिसला की अनेकजण ते फक्त घाण, टॅनिंग किंवा त्वचेची समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या मते, ही साधी गोष्ट नसून शरीरात सुरू असलेल्या गंभीर आजारांची सुरुवातीची घंटा असू शकते. ही ‘अकॅन्थोसिस नायग्रिकन्स’ (Acanthosis Nigricans - AN) नावाची त्वचेची समस्या असू शकते . यामध्ये मान, बगल, कोपर किंवा याठिकाणच्या त्वचेवर डाग तयार होतात.

२०२५ मध्ये ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल अपडेट्स अँड मेडिकल सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात ३३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या संशोधनात त्वचारोग विभागात येणाऱ्या सुमारे ४.७ टक्के रुग्णांमध्ये AN आढळून आला. विशेष म्हणजे, ८१ टक्के रुग्णांच्या मानेवर काळपट डाग दिसले. तसंच या समस्येचा लठ्ठपणा आणि मधुमेहाशीही मजबूत संबंध असल्याचं स्पष्ट झालं. या अभ्यासानुसार, ६७.६ टक्के रुग्ण लठ्ठपणाने ग्रस्त होते, तर १८.८ टक्के रुग्णांना मधुमेह असल्याचं दिसून आलं.

मान काळी पडण्यामागे काय कारण असतं?

डॉक्टरांच्या मते, मान काळी पडण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’. ही अशी स्थिती असते जी पुढे जाऊन टाइप-२ डायबेटिसचं कारण ठरू शकते. याशिवाय पीसीओएस, थायरॉईडच्या समस्या यांसारख्या हार्मोनल समस्यांमुळेही ही स्थिती निर्माण होऊ शकते.

औषधांमुळे वाढतो काळपटपणा

काही औषधांमुळेही मानेभोवती काळेपणा वाढू शकतो. विशेषतः स्टेरॉइड्स, गर्भनिरोधक गोळ्या यांसारख्या औषधांमुळे ही समस्या जावणू शकते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये अचानक मान काळी पडणे हे पोट, स्वादुपिंड किंवा यकृताशी संबंधित कॅन्सरचं लक्षणही असू शकतं.

त्वचेमध्ये अजून कोणते बदल जाणवतात?

या आजारात त्वचा जाड होणं, मऊ होणं आणि काळसर दिसू शकते. हे डाग मुख्यतः मानेच्या मागील भागात, बगलेत किंवा कोपरांवर दिसतात. काही वेळा खाज येणं, सौम्य दुर्गंधी किंवा त्वचेवर छोटे स्किन टॅग्सही दिसू शकतात. साधारणपणे ही समस्या हळूहळू वाढते. मात्र अचानक काळेपणा वाढू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

जीवनशैलीत बदल ठरेल महत्त्वाचा

उपचारांमध्ये सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे जीवनशैलीत बदल करणं. वजन नियंत्रणात ठेवणं, नियमित व्यायाम करणं आणि साखरेचं सेवन कमी करणं यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि त्वचेवरील काळेपणा कमी होण्यास मदत होते. मधुमेह, पीसीओएस किंवा थायरॉईडसारख्या मूळ आजारांवर योग्य उपचार केल्यास त्वचेतही सुधारणा दिसू शकते.

तज्ज्ञांच्या मते, ही समस्या टाळण्यासाठी काही साध्या सवयी उपयुक्त ठरतात. वजन नियंत्रणात ठेवणं, जास्त साखर टाळणं, संतुलित आहार घेणं आणि मानेचा भाग स्वच्छ व कोरडा ठेवणं आवश्यक आहे. याशिवाय दररोज सनस्क्रीन वापरणंही महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिसांची नजरचूक, भलत्याच व्यक्तीचा गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावर; कोर्टात नेमकं काय घडलं?

Maratha Reservation: ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, प्रसाद लाड यांचं मोठं विधान; मनोज जरांगेंना दिला शब्द

Coconut Oil : सुकलेल्या नारळापासून ५ मिनिटात बनवा घरच्या घरी खोबरेल तेल, जाणून घ्या रेसिपी

Maharashtra News Live Update: गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी

पुण्याला मिळाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठे धावणार? थांबे कोणते? A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT