Nutritious Food  google
लाईफस्टाईल

Nutritious Food : उगाच का पौष्टीक खाण्यामागे पळताय? उत्तम पदार्थ तर तुम्ही रोजच्या आहारात जेवताय, तज्ज्ञांनीच उलगडलं रहस्य

Dal Chawal : प्रत्येक घरात नेहमी बनणारा पदार्थ म्हणजेच वरण भात. बाळाला दात यायला लागले की, आई त्याला वरण भात भरवायला सुरुवात करते. तेव्हापासून प्रत्येक व्यक्ती वरण भात खायला सुरुवात करते.

Saam Tv

प्रत्येक घरात नेहमी बनणारा पदार्थ म्हणजेच वरण भात. बाळाला दात यायला लागले की, आई त्याला वरण भात भरवायला सुरुवात करते. तेव्हापासून प्रत्येक व्यक्ती वरण भात खायला सुरुवात करते. हा पदार्थ कोणत्याही भारतीयाच्या घरी हमखास तयार केला जातो. हा पदार्थ चवीला जितका स्वादिष्ट असतो, तितकाच तो तब्बेतीसाठी पौष्टीक मानला जातो. वरण भातात अनेक गुणधर्म असतात जे शरीरासाठी पुरक असतात. चला तर जाणून घेऊ रोज वरण खाण्याचे विविध फायदे.

रोज वरण भात खाण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत:

स्नायू आणि अपचनावर फायदेशीर

वरण भातात प्रोटीन फायबर, व्हिटॅमिन ए, डी, इ, बी-१, के अशा अनेक प्रकारचे गुणधर्म असतात. शिवाय हे प्रोटीन स्नायुंना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. तसेच हा हलका आहार असल्याने पचनसंस्था उत्तम प्रकारे कार्य करते.

वजन कमी करण्यासाठी वरण भाताचा समावेश

वरण भातात भरपुर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतात. त्याने फॅट वाढत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते. वरण भात खाल्ल्याने तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहते.

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी वरण भाताचा उपयोग

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी बऱ्याच वेळेस डॉक्टर वरण भात खाण्याचा सल्ला देतात. वरण भातात भरपुर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे योग्य प्रमाणात ब्लड शुगर कंट्रोल होतं. तसेच डाळीमध्ये फोलेटचा समावेश असतो त्याने ह्रदयाला होणारे धोके किंवा त्यासंबंधीचे आजार होत नाहीत. तसेच आहारात वरण भात असेल तर पोट भरतं आणि बाहेरचं खाणं आपोआप कमी होतं.

चांगली झोप मिळवण्यासाठी वरण भात फायदेशीर

तुम्ही जर रात्रीच्या जेवणात वरण भाताचा समावेश करत असाल तर तुम्हाला चांगली झोप मिळू शकते. चांगली झोप नेहमीचं शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. तसेच वरण भात खाल्याने मेंदूचे कार्य सुधारते. स्टेस किंवा डिप्रेशन या समस्या वरण भात खाल्याने कमी होताता.


Written By : Sakshi Jadhav

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT