ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वरण भात किंवा डाळ भात अनेक भारतीयांच्या आवडीचं खाद्य पदार्थ मानलं जातं.
वरण बनवण्यासाठी तूर डाळीचा उपयोग केला जातो. तूर डाळीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात ज्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला फायदे होतात.
तूर डाळीमध्ये आढळणारे प्रथिने तुमच्या शरीरातील स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात.
भाताचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील उर्जा वाढण्यास मदत करते.
वरण भात हा पदार्थ पचनासाठी सोपा आणि हलका मानला जातो.
वरण भातामध्ये जास्त फॅट नसतात म्हणून त्याचे सवन केल्यास तुमचं वजन नियंत्रत राहातं
डाळीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.