Daily cumin water benefits SAAM TV
लाईफस्टाईल

Daily cumin water benefits: जिऱ्याचं पाणी प्यायल्याने खरंच पचनक्रिया सुधारते? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Jeera water benefits: दररोज जिऱ्याचे पाणी पिण्यामुळे पचनक्रिया सुधारते, गॅस व पोट फुगण्याची समस्या कमी होते. आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जिऱ्याच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

जवळजवळ प्रत्येक घरात स्वयंपाकात जिऱ्याचा वापर केला जातो. तुम्हाला माहितीये का की, जिरं हे फक्त केवळ एक मसाला नाही तर त्यात विविध प्रकारची पोषक तत्वं असतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तुम्ही ऐकलं असेल की, अनेक लोक आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी जिऱ्याचं पाणी पितात. मात्र दररोज जिऱ्याचं पाणी पिणे फायदेशीर आहे का, की त्याचे काही तोटे आहेत हे जाणून घेऊया.

रोज जिऱ्याचं पाणी पिणं पचनासाठी चांगलं?

बहुतेक लोक वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज जिऱ्याचं पाणी पितात. खरं तर, यामुळे चयापचय क्रिया सुधारते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दररोज जिऱ्याचं पाणी पिणं पचनासाठी चांगले आहे का, याचं उत्तर होय असं आहे.

ओनली माय हेल्थ वेबसाईटला माहिती देताना आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी सांगितलं की, "पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज जिऱ्याचं पाणी पिणं हा एक चांगला पर्याय आहे. जिऱ्याच्या पाण्यात असे घटक देखील असतात जे पोट फुगी कमी करतात आणि शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकतात."

पचनासाठी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

पचनक्रिया चांगली राहते

डॉ. शर्मा यांच्या मते, जिऱ्यामध्ये थायमोल नावाचा एक एक्टिव्ह घटक असतो. तो आपल्या स्वादुपिंड आणि लाळ ग्रंथींना पाचक एन्झाइम्स आणि पित्त रस स्रवण्यासाठी उत्तेजित करतो. हे एन्झाइम्स अन्नातील कर्बोदके, चरबी आणि प्रोटीन यांचं विघटन करून ते अधिक वेगाने पचण्यास मदत करतात. त्यामुळे, जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

पोट फुगण्यापासून आराम

नियमितपणे जिऱ्याचं पाणी प्यायल्याने गॅस आणि पोट फुगण्यापासून आराम मिळण्यास मदत होते. जिऱ्याच्या पाण्यात वातरोधक गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या आतड्यांमध्ये गॅस जमा होत नाही. जिऱ्याचं पाणी पोटाच्या स्नायूंना आराम देते ज्यामुळे ॲसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ कमी होण्यास मदत होते.

आतड्यांसाठी उत्तम

जिऱ्यामध्ये शक्तिशाली एंटी-माइक्रोबियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. दररोज जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पोट आणि आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट होण्यास मदत होते. यामुळे आतड्यातील चांगले जीवाणू वाढतात बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी जिऱ्याचं पाणी फायदेशीर ठरतं.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

मोठी बातमी! राहुल गांधीच्या आंदोलनावर मोदी सरकारचं प्रत्युत्तर, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी केले गंभीर आरोप

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT