Dahi Handi Safety Precautions Saam TV
लाईफस्टाईल

Dahi Handi Safety Precautions : गोविंदा आला रे आला! दहीहंडी फोडताना 'या' वस्तू स्वत:जवळ ठेवायला विसरू नका

Govinda Self-care Tips During Celebrations : आता तुम्ही देखील दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आणि महत्वाची आहे.

Ruchika Jadhav

आज संपूर्ण राज्यात आणि देशभरात दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गोविंदा आपली मानाची दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेत. दहीहंडी सणासाठी सर्वत्र तयारी आणि सराव सुरू आहे. तरुण तरुणींसह लहान मुलांमध्ये देखील दहीहंडीच्या साहसी खेळासाठी उत्साह संचारला आहे.

आता तुम्ही देखील दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आणि महत्वाची आहे. येथे गोविंदाने हंडी फोडताना कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती देण्यात आली आहे.

हेल्मेटचा वापर

गोविंदा उंचावर बांधलेली दहीहंडी फोडतात. ही दहीहंडी फोडण्यासाठी एकावर एक अनेक थर रचले जतात. काहीवेळा 7 ते 8 थरांची देखील दहीहंडी असते. अशावेळी एखादा गोविंदा झाली पडला तर त्याला मिठी दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण स्वतः आपली काळजी घेण्यासाठी डोक्यात हेल्मेट घालावे. याने तुम्ही खाली पडले तरी तुमच्या डोक्याला मार लागणार नाही.

गुडघा आणि कोपर पॅड

दहीहंडीचा साहसी खेळ खेळायचा म्हणजे दुखापत होणारच. ही दुखापत होऊ नये म्हणून प्रत्येक गोविंदाने गुडघा आणि कोपर पॅड वापरले पाहिजे. याने खाली पडल्यावर तुमचे गुढघे आणि कोपर अगदी सेफ राहतील.

मंगटावर सेफ्टी बँड

एकमेकांचे हात धरून वरती एक एक थर रचताना आपल्या मनगटात बळ असले पाहिजे. त्यासाठी हातामध्ये सेफ्टी बँड घालून घ्या. असे केल्याने तुमचे हात मजबूत होतात. तसेच आलेला भार सहन करण्यासाठी तुम्हाला एक सपोर्ट मिळतो.

सर्वात वरती असल्यास विशेष काळजी

दहीहंडी फोडण्यासाठी सर्वात वरती लहान गोविंदांना पाठवले जाते. अशावेळी त्यांना पूर्ण सुरक्षा देणे गरजेचे असते. वरती जाण्याआधी त्यांना सुरक्षित किट घातले पाहिजे. कारण लहान मुलांचे हाडे फार नाजूक असतात तसेच त्यांना हेल्मेट सुद्धा घातले पाहिजे.

स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप

दहीहंडी फोडण्याच्या अगदी तासभर आधी तुम्ही स्वतः स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप केले पाहिजे. यामुळे तुम्ही सहज या खेळ खेळू शकाल. स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप केल्याने स्नायू फिट राहतात तसेच तुम्हाला झटपट हालचाल करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT