Dum Anda Biryani Recipes  Saam Tv
लाईफस्टाईल

Dum Anda Biryani Recipes : ढाबा स्टाईलने बनवा दम अंडा बिर्याणी, या सोप्या टिप्स लक्षात ठेवा; एकदा चव चाखाल तर खातच राहाल

Home Made Hotel Style Dum Anda Biryani : ढाबा स्टाईलची दम अंडा बिर्याणीची चव चाखायची असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा. बनेल एकदम परफेक्ट आणि चविष्ट पाहूया रेसिपी

कोमल दामुद्रे

Weekend Special Recipe :

वीकेंड, पार्टी किंवा काही स्पेशल असेल तर बिर्याणी शिवाय चव पूर्णच होऊच शकत नाही. बिर्याणीचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लग्न, पार्टी, सण वाढदिवस किंवा कोणताही खास क्षण असला की, आपण सगळ्यात सोपी आणि परफेक्ट डिश म्हणून बिर्याणीला प्राधान्य देतो.

कधीतरी हॉटेल किंवा ढाब्यावर आपण चवी चवीने ही बिर्याणी खातो परंतु, घरी बनवताना याची चव चाखता येत नाही. किती ट्राय केल तरी जिभेवर त्याची चव टिकून राहाते. पण ढाबा स्टाईलची दम अंडा बिर्याणीची चव चाखायची असेल तर या सोप्या टिप्स (Tips) फॉलो करा. बनेल एकदम परफेक्ट आणि चविष्ट पाहूया रेसिपी (Recipes).

1. साहित्य | Ingredients

  • अंडा दम बिर्याणी रेसिपी | Anda Dum Biryani Recipe

  • बिरिस्ता करण्या साठी I Preparing Birista

  • उभा बारीक चिरलेला कांदा ४-५ I Thinly sliced Onions 4-5

  • टोमॅटो प्युरी ४-५ I Tomato Puree 4-5

  • अंडी १० I Eggs 10

  • तेल – तळणीसाठी I Oil for frying

  • रंगासाठी I For Color

  • केसर १०-१२ पाकळ्या I Kesar/Saffron 10-12 strands

  • दूध १/४ वाटी I Milk ¼ cup

  • अंडा तळण्यासाठी I For frying Eggs

  • उकडलेली अंडी १० I Boiled eggs 10

  • मीठ २ चिमूट I Salt 2 pinch

  • मिरची पावडर २ चिमूट I Red chili powder 2 pinch

  • हळद २ चिमूट I Turmeric 2 pinch

  • गरम मसाला २ चिमूट I Garam Masala 2 pinch

  • तेल २ चमचे I Oil 2 tbsp

  • मसाल्यासाठी I For making Spices

  • तेल ४-५ चमचे I Oil 4-5 tbsp

  • उभा चिरलेला कांदा ४-५ I Thinly sliced Onion 4- 5

  • आले लसूण पेस्ट १ चमचा I Ginger Garlic Paste 1 tbsp

  • दही १/२ वाटी I Curd ½ cup

  • लाल मिरची पावडर तिखट १ चमचा I Spicy Red Chilli Powder 1 tsp

  • बेडगी मिरची पावडर १ चमचा I Bedgi Mirchi Powder 1 tsp

  • हळद १/२ चमचा I Turmeric ½ tsp

  • धणे पूड १ चमचा I Coriander Powder 1 tsp

  • बिर्याणी मसाला २ चमचा I Biryani Masala 2 tsp

  • टोमॅटो प्युरी ३-४ मध्यम I Tomato Puree 3-4 medium

  • मीठ चवीअनुसार I Salt as per taste

  • बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ वाटी I Finely chopped Coriander ¼ cup

  • बारीक चिरलेला पुदिना १/४ वाटी I Finely Chopped Mint Leaves ¼ cup

  • भातासाठी I Rice

  • बासमती तांदूळ १/२ किलो I Basmati Rice ½ kg

  • दालचिनी १ इंच I Cinnamon 1 inch

  • काळी मिरी ७-८ I Black Pepper 7-8

  • लवंग ७-८ I Cloves 7-8

  • तमाल पत्र २-३ I Bay Leaf 2-3

  • हिरवी वेलची ४-५ I Cardamom 4-5

  • शहा जिरे १ चमचा I Shahi cumin Seeds 1 tsp

  • अर्धा लिंबाचा रस I ½ lemon juice

  • मीठ चवीअनुसार I Salt as per taste

  • पुदिना पाने १/४ वाटी I Mint Leave ¼ cup

  • थर लावण्यासाठी I For Layers

  • तळलेली अंडी I Fried Eggs

  • रेडी मसाला I Ready Masala

  • बिरिस्ता I Birista

  • शिजवलेला भात I Cooked Rice

  • चिरलेलें कोथिंबीर I Chopped Coriander

  • चिरलेले पुदीने I Chopped Mint Leaves

  • केसर दूध I Saffron Milk

  • तूप २-३ I Ghee 2-3

कृती

  • सगळ्यात आधी उकडलेल्या अंड्यांना काट्याच्या चमच्याने टोचून घ्या. वरुन हळद, तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करुन घ्या.

  • पॅनमध्ये तेल गरम करुन अंडी फ्राय करुन घ्या. फ्राय झाल्यानंतर अंडी काढून घ्या.

  • नंतर त्याच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा त्यात चिरलेला कांदा घाला. आलं-लसूणची पेस्ट घालून चांगले फ्राय करुन घ्या.

  • त्यानंतर दही घेऊन त्यात वरील सर्व मसाले मिक्स करा आणि फ्राय केलेल्या कांद्यामध्ये घाला. चांगले परतून घ्या. त्यात टोमॅटोची प्युरी, मीठ, पुदीन्याची पाने आणि कोथिंबीर घालून परतून घ्या.

  • बिर्याणीचा तांदूळ धुवून घ्या, एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा त्यात खडा मसाला घालून ढवळून घ्या. वरुन लिंबू पिळून घ्या. त्यात तांदूळ घाला.

  • भात शिजल्यानंतर त्यातील पाणी गाळून घ्या. नंतर कांदा कुरकुरीत तळून घ्या.

  • नंतर बिर्याणीच्या कुकरमध्ये तयार केलेले दह्याचे पेस्ट घाला. वरुन अंडी आणि तळलेला कांदा, कोथिंबीर, थोडासा शिजवलेला भात घालून पसरवून घ्या.

  • वरुन पुन्हा फ्राय केलेला कांदा, पुदिन्याची पाने, कोथिंबीर आणि केशरी दुध आणि तूप घाला. उरलेला भात घालून त्यात अंडी, फ्राय केलेला कांदा आणि तूप घाला.

  • कुकरचे झाकण लावून वाफ काढून घ्या. कोशिंबीर, सलाद सोबत सर्व्ह करा दमदार अंडा बिर्याणी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT